Home मराठी वेश्या व्यवसाय करणाऱ्यांसाठी UIDAI ची मोठी घोषणा! आता मिळणार ‘ही’ विशेष सुविधा

वेश्या व्यवसाय करणाऱ्यांसाठी UIDAI ची मोठी घोषणा! आता मिळणार ‘ही’ विशेष सुविधा

नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (NACO) ने जारी केलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना आधारकार्ड जारी करणार असल्याची माहिती, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. तसेच आधारकार्ड जारी करण्यासाठी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र मागितले जाणार नाही. असे देखील UIDAI ने न्यायालयाला म्हटले आहे. त्यामुळे आता वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना देखील अॅड्रेस प्रूफशिवाय आधारकार्ड मिळणार आहे.

आधार कार्ड तयार करण्यासाठी मुख्यत: सर्वसामान्य नागरिकांना नाव, लिंग, आणि पत्ता यासह ईमेल किंवा मोबाईल क्रमांक द्यावे लागते, किंवा रेशनकार्ड, रहिवासी असे प्रमाणपत्र देखील जमा करावे लागते. UIDAI ने वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना भुमा दिली असून, त्यांना कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे जमा करावे लागणार नाहीत. फक्त NACO किंवा राज्याच्या आरोग्य विभागाच्या राजपत्रित अधिकाऱ्याकडून मिळालेले प्रमाणपत्र स्वीकारे जाईल. ही एक मोठी घोषणा UIDAI ने केली आहे.

युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने आधारकार्ड तयार करण्यासाठी वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना कागदपत्रांनी भुमा दिली आहे. आधारकार्ड तयार करण्यासाठी त्यांना फक्त NACO किंवा राज्याच्या आरोग्य विभागाच्या राजपत्रित अधिकाऱ्याकडून मिळालेले प्रमाणपत्र स्वीकारे जाईल. असे आधार कार्ड कंपनीने सुप्रीम कोर्टात म्हटले आहे. NACO हा केंद्रीय आरोग्‍य आणि कुटुंब कल्‍याण मंत्रालयाच्‍या अखत्यारीतील एक विभाग असून, हे विभाग वेश्या व्यवसाय करणाऱ्यांचा केंद्रीय डेटाबेस ठेवतो.

वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना आधारकार्ड प्रदान करण्यात यावे अशी याचिका 2011 साली सुप्रीम कोर्टात करण्यात आली होती. भारतीय वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना सामाजिक सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती. त्या याचिकेत वेश्या व्यवसायशी संबंधित अनेक मुद्द्यांचा समावेश करण्यात आला होता. तसेच वेश्या व्यवसायातून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांसाठी पुनर्वसन योजना तयार करण्याच्या मुद्द्याचाही त्यात समावेश आहे.

Previous article7554 नवीन संक्रमित आढळले, 85680 अ‍ॅक्टिव्ह प्रकरणे; एका दिवसात जवळपास 7000 ची घट
Next article#Nagpur | राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय के क्षेत्रीय कार्यालय में आजादी का अमृत महोत्सव पर कार्यशाला संपन्न
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).