Home Stock Market Equity Mutual Funds । सर्वोत्तम रिटर्नसाठी हवं प्रभावी प्लॅनिंग, मार्केट घसरणीवेळी काय...

Equity Mutual Funds । सर्वोत्तम रिटर्नसाठी हवं प्रभावी प्लॅनिंग, मार्केट घसरणीवेळी काय करावं

457

नवी दिल्ली ब्युरो : शेअर बाजारात तेजी-घसरणीचं सत्र सुरू आहे. रशिया-युक्रेन वादाचा फटका गुंतवणुकदारांना बसला आहे. कोट्यावधी रुपयांवर गुंतवणुकदारांना पाणी सोडावं लागलं आहे. अनिश्चिततेच्या काळात गुंतवणुकदार सुरक्षित पर्यायाच्या शोधात आहेत. तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत असाल गुंतवणुकदारांना नेमकं काय करायला हवी याची माहिती हवी. आर्थिक जाणकारांच्या मते, इक्विटी म्युच्युअल फंड संपूर्णपणे बाजाराच्या जोखमीवर आधारित आहे. बाजारात घसरण दिसून आल्यास गुंतवणुकदारांच्या पोर्टफोलित घट होते. त्यामुळे गुंतवणुकदारांना जोखमीबद्दल पूर्णपणे माहिती हवी. आर्थिक शिस्तीमध्ये संपत्ती वितरण, पोर्टफोलिओ रिव्ह्यू आदींचा समावेश होतो. त्यामुळे तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित ठरेल आणि सर्वोत्तम गुंतवणुकीची प्राप्ती देखील होईल.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी रिस्क प्रोफाईलची माहिती असणं महत्वाचे असलयाचे अर्थ जाणकराचं म्हणणं आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांना जोखमीबद्दल पूर्ण माहिती मिळेल. गुंतवणुकदारांना गुंतवणुकीचं लक्ष्य, गुंतवणुकीचा कालावधी, कौटुंबिक आर्थिक बजेट, अपेक्षित रिटर्न याबद्दल गुंतवणुकीपूर्वीच स्पष्टता हवी. सर्व गोष्टींमुळे गुंतवणुकदारांना जोखमीचे मूल्यांकन करणे सुलभ ठरेल. जोखमीच्या नुसार संपत्तीचे वितरण सोपे ठरेलं.

विभिन्न फंडात गुंतवणूक करा-
मार्केट एक्सपर्टस यांनी विविध कॅटेगरीच्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. स्मॉलकॅप, मिड कॅप, लार्ज कॅप, मिक्स्ड कॅप आदी कॅटेगरी असू शकतात. विभिन्न कॅटेगरीसाठी संपत्तीचे वितरण देखील भिन्न ठरते. तुमच्या जोखमीच्या क्षमतेनुसार तुम्ही फंडची निवड करू शकतात. गुंतवणुकदारांनी नेहमी आपला पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण ठेवायला हवा.

बाजार करेक्शन, स्मॉल कॅप हवा:
शेअर बाजारात तेजी-घसरणीच्या स्थितीत म्युच्युअल फंडच्या सर्व युनिटवर परिणाम होतो. घसरणीच्या स्थितीत लार्ज कॅपवर कमी परिणाम होतो. तर स्मॉल कॅपवर अधिक परिणाम संभवतो. त्यामुळे मार्केटच्या अस्थिरतेच्या स्थितीनुसार गुंतवणुकदार स्मॉल कॅप, लार्ज कॅप आणि मिड कॅप मध्ये गुंतवणूक कमी-अधिक करू शकतात. शेअर बाजारात घसरण आल्यास स्मॉल कॅपमध्ये गुंतवणुकीत वाढ केली जाऊ शकते. कारण तेजी आल्यानंतर अधिक रिटर्न मिळण्याची शक्यता अधिक असते.

गुंतवणूक हवी दीर्घकाळ:
गुंतवणूक तज्ज्ञांनी दीर्घकाळ गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. तुम्ही अधिक काळ गुंतवणुक करत असल्यास रिटर्न मिळविण्याची शक्यता अधिक वाढते. दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्याने जोखमीची क्षमता घटते. गुंतवणुकीच्या दरम्यान पोर्टफोलिओचा रिव्ह्यू मात्र आवश्यक आहे. वर्षातून किमात तीन-चार वेळा पोर्टफोलिआचा रिव्ह्यू करण्याचा सल्ला दिला जातो.

Previous articleहवालदारांचे फौजदार होण्याचे स्वप्न पूर्ण होणार; शासनादेश झाला जारी, सतरा हजार पदे वाढणार
Next articleरश्मी शुक्लांविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल; आघाडी सरकार अ‍ॅक्शन मोडवर, पुणे पोलिसांची कारवाई
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).