Home मराठी संजय राऊत । किरीट सोमय्यांनी 7500 कोटींचा भ्रष्टाचार केला; अमित शहा, फडणवीसांच्या...

संजय राऊत । किरीट सोमय्यांनी 7500 कोटींचा भ्रष्टाचार केला; अमित शहा, फडणवीसांच्या नावाने केली वसुली

483

भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊतांनी किरीट सोमय्यांच्या विरोधात खळबळजनक आरोप केले आहेत. किरीट सोमय्या यांनी कोट्यवधी रुपयांची वसुली केली असल्याचा आरोप राऊतांनी त्यांच्यावर केला आहे. एवढेच नाही तर अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरही सोमय्यांनी वसुली केल्याचा आरोप राऊतांनी केला.

याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘किरीट सोमय्या यांनी गेल्या काही वर्षांमध्ये तब्बल 7500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. तसेच किरीट सोमय्या आपल्याच चपलेने स्वच:लाच मारणार असून लोक लवकरच किरीट सोमय्या यांची कपडे काढून धिंड काढतील.’ असे देखील राऊत म्हणाले आहेत. तसेच पवईतील पुनवर्सन प्रकल्पामध्ये बोगस लाभार्थींची नावे घुसवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंजुरी दिली होती. त्यावेळी सोमय्यांनी या मंजुरीसाठी देवेंद्र फडणवीस यांना 50 कोटी दिले असल्याचे सांगितले होते.’

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, ‘सोमय्या दिल्लीतील काही नेत्यांची धमकी देऊन पैसे उकळत आहेत. अमित शाहांच्या नावावरही त्यांनी पैसे उकळले आहेत. सोमय्यांनी फडणवीसांच्या नावावर पैसे उकळले असले तरी यात फडणवीस सहभागी असतील असे मला वाटत नाही. सोमय्या यांच्याविरोधात माझ्याकडे अनेक लोकांनी तक्रारी केल्या आहेत. माझ्याकडे त्यांच्याविरोधात एकूण 211 प्रकरणे आहेत. आता मी रोज एकएक प्रकरण बाहेर काढणार आहे.’ असा इशारा देखील संजय राऊतांनी दिला आहे.

Previous articleबप्पी लहरी का आज सुबह 10 बजे विले पार्ले श्मशान में अंतिम संस्कार, सेलेब्स ने किए अंतिम दर्शन
Next article#Maha_Metro | जास्तीत जास्त नागरिकांना मेट्रोशी जोडावे : डॉ. दीक्षित
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).