Home मराठी Nagpur | दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन नंबर, फोन करून समुपदेशन करा

Nagpur | दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन नंबर, फोन करून समुपदेशन करा

381

नागपूर ब्युरो : दहावी आणि बारावीत विद्यार्थी गेले की, मनात एक दडपण असते. बोर्डाची परीक्षा कशी द्यावी, असा विचार मनात येतो. ही भीती दूर घालविण्यासाठी नागपूर विभागीय शिक्षण मंडळाने पुढाकार घेतला आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यासाठी चार समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेसंदर्भात माहिती देण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुरू केले आहे. या हेल्पलाईनवर विद्यार्थी आपल्या समस्या सांगू शकतात. त्यांच्या समस्यांवर समुपदेशक योग्य मार्गदर्शन करतील. गोंधळलेल्या विद्यार्थ्यांना काय करावे हे कधी-कधी समजत नाही. अशावेळी तुमच्या मदतीला हे समुपदेशक कामास येतील. त्यामुळं मनात कोणत्याही प्रकारची भीती न ठेवता. तुमच्या मनातील प्रश्न समुपदेशकांना विचारावे. विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची संधी आहे. या संधीचे सोने करावे.

किती विद्यार्थी देणार परीक्षा?

भंडारा जिल्ह्यात 17 हजार 20 विद्यार्थी दहावीची, तर 18 हजार 107 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. नागपूर शहरात 33 हजार 498 विद्यार्थी दहावीची, तर 37 हजार 805 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. तर नागपूर ग्रामीणमध्ये 27 हजार 590 विद्यार्थी दहावीची, तर 26 हजार 584 बारावीचे विद्यार्थी परीक्षा देणार आहे. याशिवाय चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यातही विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या सर्व विद्यार्थ्यांसाही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सकाळी नऊ ते सायंकाळी सातदरम्यान करा तक्रार

राज्य शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी व त्यांच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी विभागीय मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून नावे मागितली. त्यापैकी चार अधिकाऱ्यांना समुपदेशनासाठी नियुक्त करण्यात आले आहे. चार फेब्रुवारीपासून ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी सात दरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात काही अडचणी असतील तर खालील क्रमांकावर संपर्क करावा. संबंधित अधिकारी तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करतात. 0712-2565403 या लँडलाईनवर संपर्क साधता येईल. श्रीराम चव्हाण (9822695372), ए. एन. कन्नमवार (9623456828), जी. व्ही. आडे (9420719049) तसेच जे. के. बांते (9423703092) यांच्याशी सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजतादरम्यान संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleमुंबईहून उड्डाण करताना एअर इंडिया विमानाच्या इंजिनाचा भाग कोसळला, भुजमध्ये आपत्कालीन लँडिंग
Next articleअमरावती मनपा आयुक्तांवर शाईफेक प्रकरण, आमदार रवी राणांसह दहा कार्यकर्त्यांवर गुन्हा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).