Home Award राज्य शासनाच्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा; ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जीवनगौरव पुरस्कार...

राज्य शासनाच्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा; ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

509

राज्य शासनाचा यंदाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक तथा उदगीरच्या अ.भा.साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे यांना जाहीर करण्यात आला आहे. पाच लाख रु. रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने दरवर्षी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साहित्यिकांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. बुधवारी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. श्री. पु. भागवत पुरस्कार (२०२१) लोकवाङ्मय गृह, मुंबई या संस्थेला जाहीर करण्यात आला.

तीन लाख रुपये रोख आणि मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यास पुरस्कार रमेश वरखेडे यांना जाहीर करण्यात आला. दोन लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (२०२१, व्यक्तींसाठी) डॉ. चंद्रकांत पाटील यांना जाहीर करण्यात आला. डॉ. अशोक केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२१ (संस्थेसाठी) मराठी अभ्यास परिषद पुणे यांना जाहीर करण्यात आला. कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार २०२१ (संस्थेसाठी) मराठी अभ्यास केंद्र, मुंबई यांना जाहीर करण्यात आला.

Previous articleवेस्टइंडीज सीरीज से पहले इंडिया को झटका:शिखर, श्रेयस और गायकवाड समेत 8 खिलाड़ी कोरोना संक्रमित
Next articleराज्यात 600 सुपरमार्केट, मॉलला मिळणार वाइन विक्रीचा परवाना; मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).