Home मराठी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 74 वी पुण्यतिथी; काँग्रेस नेते राहुल गांधी...

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 74 वी पुण्यतिथी; काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वाहिली श्रद्धांजली

507

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 74 वी पुण्यतिथी आहे. काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राहुल यांनी महात्मा गांधी यांचे आवडते भजन रघुपति राघव राजा राम आणि गांधीच्या चश्माचा फोटो ट्विटर शेअर केला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, एका हिंदुत्ववादीने महात्मा गांधींची हत्या केली होती. सर्व हिंदुत्ववाद्यांना असे वाटते की, गांधीजी जिंवत नाहीत, मात्र जिथे सत्य आहे, तिथे गांधीजी नेहमी जिंवत राहतील. असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. 30 जानेवारी 1948 रोजी नाथूराम गोडसेनी महात्मा गांधी यांनी गोळी झाडून हत्या केली होती. त्यामुळे या दिवसाला शहीद दिवस म्हणून साजरा केले जाते.

राहुल गांधी यांच्यावर असलेल्या मानहानी प्रकरणावर येत्या 5 फेब्रुवारीपासून न्यायालयात सुनावणी होणार आहे. अंतिम निर्णय येईपर्यंत रोज या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी 2014 साली ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या खटल्याशी संबंधित हे आदेश दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश आणि भिवंडीतील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे.व्ही.पालीवाल यांनी दिले आहेत.

30 जानेवारी 1948 रोजी नवी दिल्लीतील बिडला भवन येथे नाथूराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या केली होती. अंहिसाचा नारा देणारे या महान व्यक्तीच्या जीवनाचा अंत झाल्यानंतर देशवासियांनी मनातल्या मनात गांधींना राष्ट्रपिता मानण्यास सुरुवात केली.

नेताजी सुभाष चंद्र बोस आणि महात्मा गांधी यांच्यात मतभेद असल्याचे सांगितले जाते. मात्र सर्वात आधी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 6 जुलै 1944 रोजी रंगून रेडिओ स्टेशनवर दिलेल्या आपल्या भाषणात गांधींजींना राष्ट्रपिता म्हटले होते. नेताजी यांनी आझाद हिंद सेनेच्या स्थापनेवेळी महात्मा गांधी यांचे आशिर्वाद मागितले होते. भाषणाच्या शेवटी सुभाषचंद्र बोस म्हणाले होते की, ‘आमचे राष्ट्रपिता, भारताच्या स्वातंत्र्याच्या पवित्र लढ्यात मी तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मागतो आहे.’ असे सुभाष चंद्र बोस म्हणाले होते.

Previous articleकाश्मीरमध्ये 12 तासांत 2 चकमक:जैश कमांडर जाहिद वानीसह 5 दहशतवादी ठार
Next articleरिकॉर्ड स्तर पर पहुंची बेरोजगारी : देश में 3.03 करोड़ युवाओं के पास काम नहीं
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).