Home Covid-19 राज्यात तिसरी लाट येऊन गेली, मास्क महत्वाचाच! नव्या व्हेरिएंटचा WHO कडून अभ्यास...

राज्यात तिसरी लाट येऊन गेली, मास्क महत्वाचाच! नव्या व्हेरिएंटचा WHO कडून अभ्यास सुरू -आरोग्य मंत्री

382

राज्यात मास्कमुक्तीबाबत चर्चा सुरू असताना त्यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही मास्क मुक्तीचा निर्णय झाला नाही. स्वतःला वाचवण्यासाठी अजुनही मास्क आवश्यक आहे. यासोबतच, राज्यात तिसरी लाट येऊन गेली असे महत्वाचे विधान आरोग्य मंत्र्यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना केले आहे.

ओमायक्रॉनने देशात कोरोनाची तिसरी लाट आणली होती. आरोग्य मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात तिसरी लाट येऊन गेली आहे. रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. त्यातच आता वटवाघळांमुळे कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आला आहे. तरीही या व्हेरिएंटची अद्याप एकाही माणसाला लागण झाल्याची पुष्टी नाही. यासोबतच, हा व्हेरिएंट किती घातक आहे, याचा अभ्यास सध्या जागतिक आरोग्य संघटना करत आहे अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

BioRxiv वेबसाइटवर प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, चीनच्या वुहानमधील संशोधकांनी, जिथे 2019 मध्ये कोरोना विषाणू पहिल्यांदा आढळला होता, त्यांनी नवीन प्रकारचा कोरोना व्हेरिएंट नियोकोव (NeoCoV) शोधल्याचा दावा केला आहे.

चिनी संशोधकांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएंट ‘नियोकोव’चा प्रसार आणि मृत्यू दर दोन्ही खूप जास्त आहेत. या अभ्यासानुसार, या नवीन विषाणूची लागण झालेल्या प्रत्येक तीनपैकी एकाचा मृत्यू होण्याचा धोका आहे.

Previous articleअर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला होण्यावर प्रश्नचिन्ह, विधिमंडळ प्रशासनाने मुख्यमंत्र्यांची मागितली वेळ
Next articleकाश्मीरमध्ये 12 तासांत 2 चकमक:जैश कमांडर जाहिद वानीसह 5 दहशतवादी ठार
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).