Home मराठी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला होण्यावर प्रश्नचिन्ह, विधिमंडळ प्रशासनाने मुख्यमंत्र्यांची मागितली वेळ

अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला होण्यावर प्रश्नचिन्ह, विधिमंडळ प्रशासनाने मुख्यमंत्र्यांची मागितली वेळ

379

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला होण्यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला होण्याबाबत प्रश्नचिन्ह झालंय. हिवाळी अधिवेशन संपताना अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेण्याबाबत घोषणा करण्यात आली होती.

आमदारांच्या आसनव्यवस्था राहण्याच्या व्यवस्था यासंदर्भात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळं अर्थ संकल्पीय अधिवेशन देखील मुंबईत होण्याची शक्यता आहे. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला न झाल्यास विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधिमंडळ कामकाज समितीची लवकरचं बैठक होण्याची शक्यता आहे.

Previous articleहादसा । गांधीधाम-पुरी एक्सप्रेस की पैंट्री कार में लगी आग, फायर ब्रिगेड मौके पर मौजूद
Next articleराज्यात तिसरी लाट येऊन गेली, मास्क महत्वाचाच! नव्या व्हेरिएंटचा WHO कडून अभ्यास सुरू -आरोग्य मंत्री
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).