Home Maharashtra लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे टॉप-5 मध्ये, 61.8 टक्क्यांसह पटकावले चौथे स्थान

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे टॉप-5 मध्ये, 61.8 टक्क्यांसह पटकावले चौथे स्थान

514

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुन्हा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत स्थान पटकावले आहे. टॉप-5 मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चौथ्या क्रमांकावर आहेत. इंडिया टुडेृच्या मूड ऑफ द नेशनने हा रिपोर्ट दिला आहे. या यादीमध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पहिल्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्या, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन तिसऱ्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चौथ्या तर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन पाचव्या क्रमांकावर आहेत.

इंडिया टुडे-सीव्होटर द्विवार्षिक मूड ऑफ द नेशन सर्व्हे-2022 नुसार ही यादी आहे. या सर्वेक्षणानंतर 43 टक्क्यांहून अधिक मते मिळालेल्या नऊ मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर केलेली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चौथे स्थान मिळाले आहे. सर्वोत्तम कामगिरी करण्याऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी स्थान मिळवले आहे. पटनायकांनी केलेली कामगिरी 71.1 टक्के नागरिकांना समाधानकारक वाटली. दुसरा क्रमांकावरील ममता बॅनर्जी यांच्या कामगिरीवर 69.9 टक्के लोकांनी समाधन मानले.

तिसऱ्या क्रमांकावरील तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांना 67.5 टक्के आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामावर 61.8 टक्के लोकांनी समाधान मानले आहे. तर पाचव्या क्रमांकावर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आहेत त्यांना 61.1टक्के मिळाले आहेत.

Previous articleकॉलेजही सुरू करण्याचा प्रस्ताव; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांची माहिती
Next articleमुंबई के ताड़देव इलाके में 20 मंजिला इमारत में भीषण आग; दो लोगों की मौत, 19 झुलसे
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).