Home Education कॉलेजही सुरू करण्याचा प्रस्ताव; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांची माहिती

कॉलेजही सुरू करण्याचा प्रस्ताव; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांची माहिती

550

२४ जानेवारीपासून महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने राज्यातील पूर्व प्राथमिक ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता लवकरच महाविद्यालयेही सुरू होण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील वर्ग ऑफलाइन सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

कोरोनामुळे महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद आहेत. या काळात वर्ग व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. राज्यात सध्या १५ ते १८ वयोगटाचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी लस घेतली आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारीपूर्वी महाविद्यालये उघडण्याबाबत विचार सुरू आहे.

बारावीची १४, तर दहावीची २५ फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा अाॅफलाइन होणार आहेत. येत्या ४ मार्चपासून बारावी, तर दहावीची लेखी परीक्षा १५ मार्चपासून सुरू होणार अाहे. बोर्डाच्या लेखी परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाणार अाहे. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ यादरम्यान होईल. दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च यादरम्यान होणार अाहेत.

शाळांनी कोविड सूचनांचे पालन करावे

– सर्व जिल्ह्यांतील स्थितीच्या आढाव्यानंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, शाळांबाबत स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे निर्देश आहेत.

शाळांपाठोपाठ सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहेदेखील सुरू करण्यात यावीत, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी विभागाला दिले. त्यामुळे बंद पडलेल्या शैक्षणिक बाबी लवकरच नियमित सुरू होतील, अशी चिन्हे आहेत.

‘सामाजिक’ची होस्टेल्सही उघडणार

– १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे १०० टक्के लसीकरण लवकरात लवकर होण्यासाठी शाळांनी जिल्हा प्रशासनासोबत प्रयत्न करावेत.
– जास्त रुग्णवाढ असलेल्या ठिकाणी जिल्हा प्रशासनासमवेत चर्चा करून निर्णय घ्यावेत. कर्मचाऱ्यांचे संपूर्ण लसीकरण होणे अत्यावश्यक आहे.

Previous articleइंडिया गेट की जगह अब नेशनल वॉर मेमोरियल में जलेगी अमर जवान ज्योति
Next articleलोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे टॉप-5 मध्ये, 61.8 टक्क्यांसह पटकावले चौथे स्थान
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).