Home मराठी टेनिसपटू सानिया मिर्झाचा निवृत्तीचा निर्णय; ऑस्ट्रेलियन ओपनच्या पराभवानंतर घेतला निर्णय

टेनिसपटू सानिया मिर्झाचा निवृत्तीचा निर्णय; ऑस्ट्रेलियन ओपनच्या पराभवानंतर घेतला निर्णय

533

भारताची टेनिस पटू सानिया मिर्झा हीने आज टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आलेल्या पराभवानंतर सानियाने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. सानिया मिर्झा आणि तिची युक्रेन येथील जोडीदार नादिया किचनोक या दोघींना ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सुरुवातीला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांना स्लोवानियाच्या तमारा जिदानसेक आणि काजा जुवान या जोडीने मात दिली होती.

सानिया मिर्झाने सामन्यानंतर सांगितले की, मी असे निर्णय घेतले आहे की, हा सीझन माझ्यासाठी शेवटचा असणार आहे. मी सध्या एक-एक आठवडा खेळत आहे. मात्र मला हे माहिती नाही की, मी हा पुर्ण सीझन खेळू शकेल की नाही, मला पण असे वाटते की, मी पूर्ण सीझनपर्यंत खेळले पाहिजे. अशी प्रतिक्रिया सानियाने दिली आहे.

सानियाने आपल्या कारकिर्दीत सहा ग्रँडस्लॅम विजेतेपदे पटकावली आहेत. महिला दुहेरीत तिने 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, 2015 मध्ये विम्बल्डन आणि यूएस ओपन जिंकले होते. मिश्र दुहेरीत तिने 2009 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, 2012 मध्ये फ्रेंच ओपन आणि 2014 मध्ये यूएस ओपन जिंकले आहे.

सानियाने 2003 मध्ये टेनिसमध्ये पदार्पण केले होते. गेल्या 19 वर्षापासून ती टेनिस खेळत आली आहे. सानिया दुहेरी खेळामध्ये क्रमांक एकची खेळाडू होती. मात्र तिला कंबरमध्ये दुखापत झाल्यानंतर तिने एकेरी खेळ सोडून दिले होते. एकेरीत अव्वल 100मध्ये पोहोचणारी ती एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे.

सानियाने 2010 मध्ये पाकिस्तानी खेळाडू शोएब मलिकसोबत लग्न केले. 2018 मध्ये मुलाच्या जन्मानंतर सानिया मिर्झा टेनिसपासून दूर गेली होती. यानंतर तिने दोन वर्षांनंतर पदार्पण केले होते.

Previous articleकोरोनाच्या तिसऱ्या लाटेत आतापर्यंत 31 लाख रुग्ण, 6912 मृत्यू
Next articleपरिणीति चोपड़ा | कहा-लकी हूं कि सूरज बड़जात्‍या और संदीप रेड्डी वंगा जैसे जीनियस के साथ काम का मिला मौका
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).