Home मराठी विदर्भासह खान्देशातही दाटले धुके, पुन्हा गारपिटीचा तज्ज्ञांकडून अंदाज

विदर्भासह खान्देशातही दाटले धुके, पुन्हा गारपिटीचा तज्ज्ञांकडून अंदाज

388

राज्यात हवामान कोरडे झाले असून तापमानात अंशत: वाढ झाली असली तरी वातावरणात गारठा कायम आहे. खान्देश, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात आगामी दोन दिवस दाट धुके, तर २१ व २२ जानेवारीला खान्देशासह विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात देवळा, निफाड, येवला, चांदवड तालुक्यात दाट धुके पसरले होते. हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी ही माहिती दिली. विदर्भात झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यात सोमवारी गोंदिया जिल्ह्यात ११ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली.

आगामी काही दिवस खान्देशमध्ये थंडी काहीशी अधिक, तर कोकणसहित दक्षिण मध्य महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये थंडी कमी जाणवेल. उर्वरित महाराष्ट्रात हळूहळू ढगाळ वातावरण निवळण्याचीही अपेक्षा आहे. रब्बी पिकासाठी आठवडाभर वातावरण काहीसे पूरक असेल. खान्देशातील धडगाव, अक्कलकुवा, अकराणी, शहादा, शिरपूर, चोपडा, रावेर, यावल तसेच विदर्भातील जामोद, धामणी, चिखलदरा, वरूडपर्यंत व सभोवतालच्या परिसरात पुढील दोन दिवस दाट धुके, तर २१-२२ ला तुरळक ठिकाणी किंचितशी गारपीटही होऊ शकते.

Previous articleखादी बाजार प्रदर्शनी | आयुर्वेद नाड़ी परीक्षण शिविर को अच्छा प्रतिसाद
Next articleकोरोना काळात वाढली श्रीमंताची संपत्ती; देशातील सर्वात श्रीमंत 10% लोकांजवळ देशाची 45% संपत्ती
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).