Home मराठी भंडारा जिल्ह्यात कोट्यवधीच्या धान खरेदी गैरव्यवहार प्रकरणी आदिवासी विकास मंत्री पाडवी यांची...

भंडारा जिल्ह्यात कोट्यवधीच्या धान खरेदी गैरव्यवहार प्रकरणी आदिवासी विकास मंत्री पाडवी यांची हकालपट्टी करण्याची मागणी

497

आमदार डॉ. परिणय फुके यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, भंडारा येथील व्यवस्थापक सोपान सांभारे यांच्यावरही कडक कारवाई करण्याची मागणी

भंडारा ब्युरो : भंडारा जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगाम २०१९-२० मध्ये धान खरेदी दरम्यान मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतर या प्रकरणाच्या अनुषंगाने एसआयटी चौकशीचे आदेश शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागाने जिल्हाधिकारी यांना दिले होते. धान खरेदीच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून फौजदारी व प्रशासकीय कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक भंडारा यांच्या अध्यक्षतेखाली अप्पर जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांची समिती गठित करण्यात आली होती. परंतु या समितीने गेल्या दहा महिन्यांपासून कोणतीही कार्यवाही केली नाही.

हे प्रकरण आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापक सोपान सांभारे यांच्या कार्यकाळातील असून, प्रकरण उजेडात आल्यानंतर शासनाने त्यांची भंडारा येथून बदली केली होती. परंतु आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांच्या वरदहस्ताने पुन्हा व्यवस्थापक सोपान सांभारे यांची बदली भंडारा येथे करण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणाबाबत एसआयटीकडून अद्यापही कार्यवाही करण्यात न आल्याने या एसआयटी चौकशी कडे जिल्हा वासियांचे लक्ष लागले असून दोषींवर कारवाई केव्हा होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणात भंडारा -गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्राचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. फुके यांनी म्हटले आहे की भंडारा जिल्ह्यात कोट्यवधीच्या धान खरेदी गैरव्यवहार प्रकरणी आदिवासी विकास मंत्री पाडवी यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी. याच प्रकरणी भंडाऱ्याचे व्यवस्थापक सांभारे यांच्यावरही कडक कारवाई करण्याची मागणी परिणय फुके यांनी केली आहे.

Previous article#Nagpur | नागपुरात दोन मुलींचे झाले साक्षगंध; जीवनसाथी म्हणून आयुष्यभर राहणार!
Next articleराष्ट्रीय शैक्षणिक धोरण मातृभाषेच्या संदर्भात महात्मा गांधींच्या ‘नई तालीम’ चे अनुकरण करते : उपराष्ट्रपती
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).