Home कोरोना #Maharashtra | अजित पवार म्हणाले – 50 पेक्षा जास्त लोक असणाऱ्या कार्यक्रमात...

#Maharashtra | अजित पवार म्हणाले – 50 पेक्षा जास्त लोक असणाऱ्या कार्यक्रमात जाणार नाही

374

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत होत असल्याचे दिसत आहे. रुग्णसंख्येच्या वाढत्या आलेखामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट राज्यावर आहे. यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे असे आवाहन सरकारकडून केले जात आहे. मात्र तरीही रुग्ण संख्या वाढत आहे.याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी काय तयारी केली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आले. यावर अजित पवार यांनी राज्य सरकारने केलेल्या तयारीची पूर्ण माहिती दिली आहे.अजित पवार म्हणाले की, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची तयारी करण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली राज्य सरकार काम करतेय. राज्यात दुसरी लाट होती तेव्हा आम्ही तयारी करण्याते आदेश दिले होते. ऑक्सिजन , व्हेंटिलेटरची तयारी करण्याचे काम केले जात आहेत. दुसऱ्या लाटेमध्ये उद्योगाचा ऑक्सिजन इकडे वळवावा लागला होता. यावेळी ऑक्सिजन कमी पडले होते. त्याच्या तिप्पट ऑक्सिजनची व्यवस्था आपापल्या भागात करावी, असे सांगण्यात आले. पुण्यात ऑक्सिजन प्लांट उभे केले आहेत असे देखील पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘राज्यात रुग्ण संख्या वाढत आहे. दरम्यान यावेळच्या अधिवेशनामध्येही आम्ही रुग्णालयातील मोठीमदत मोठी मदत केली आहे. सरकार म्हणून आमच्याकडून खबरदारी घेतली जात आहे.महापालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा नियोजनातील 20 टक्के खर्चाची मान्यता दिली आहे. तसेच. सगळ्यांनी नियमांचे पालन करावे. 50 पेक्षा जास्त लोक असतील तर मी कार्यक्रमाला जाणार नसल्याचे देखील अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले की, आता मी विचारून कार्यक्रमाला जाणार आहे. यासोबतच आमच्यासह सर्वांनी कोरोना नियमांचे पालन केले पाहिजे. कारण आम्ही जर पालन केले नाही तर लोकांना कसे सांगणार. राज्य सरकारने दिलेल्या नियमांच पालन करण्याचे आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला दिले आहे. तसेच राज्यातील सर्वांनी लस घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. पहिल्या डोसला यश आले. मात्र ग्रामिण भागात दुसऱ्या डोसला प्रतिसाद नाही, यामुळे घराघरात जाऊन लसीकरण मोहिम राबवली जाईल असे देखील अजित पवार म्हणाले.

Previous article#Nagpur | आखिरकार नागपुर की नाग नदी में पकड़ा गया मगरमच्छ
Next articleराज्यातील सर्व सरकारी वाहने असणार इलेक्ट्रिक, पर्यावरण प्रदुषणविरहीत करण्यासाठी निर्णय
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).