Home मराठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोरोनाची लागण, कोलकात्यातील वुडलँड रुग्णालयात दाखल

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोरोनाची लागण, कोलकात्यातील वुडलँड रुग्णालयात दाखल

363

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी त्यांनी आपली कोरोना चाचणी केली असता, त्यात ते पॉझिटिव्ह आढळले आहेत. उपचारासाठी त्यांना कोलकाता येथील वुडलँड रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सौरव गांगुली यांना पहिल्यांदाच कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती.

टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना या वर्षाच्या सुरुवातीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. छातीत दुखत असल्याने सौरव गांगुली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापूर्वी त्यांची एकदा अँजियोप्लास्टी देखील करण्यात आली होती.

सौरव गांगुली यांची अँजियोप्लास्टी

छातीत दुखत असल्याने गांगुलींना 2 जानेवारी 2021 रोजी कोलकाता येथील वुडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची अँजियोप्लास्टी देखील करण्यात आली होती. घरात जिमकरत असताना त्यांच्या छातीत अचानक वेदना सुरू झाल्या होत्या. त्यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पहिल्यांदा झाली कोरोनाची लागण

सौरव गांगुली यांना पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. यापुर्वी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोना झाला होता. तेव्हा गांगुली मात्र वाचले होते. मात्र आता सोमवारी त्यांनी टेस्ट केली असता, त्यांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ते सध्या उपचारासाठी कोलकात्यातील वुडलँड रुग्णालयात दाखल झाले आहेत.

Previous article#Nagpur | महा हैंडलूम की राज्यस्तरीय हथकरघा प्रदर्शनी आज से
Next articleशालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण, सोमवारीच अधिवेशनात लावली होती हजेरी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).