Home कोरोना गर्दीवर निर्बंध हवेत, सर्व नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग व्हायलाच हवे तज्ज्ञांचे मत; पंतप्रधान...

गर्दीवर निर्बंध हवेत, सर्व नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग व्हायलाच हवे तज्ज्ञांचे मत; पंतप्रधान आज घेणार बैठकीत आढावा

446

देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. रोज नवीन राज्यांत संसर्ग पोहोचत आहे. परदेशात न जाताही लोकांना संसर्ग होत आहे. एवढेच नव्हे, अनेक राज्यांत संसर्गाचा वेग मांडणारी “आर-व्हॅल्यू’ वाढू लागली आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कोविड-१९च्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली आहे.

या आठवड्यात ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी कोरोना रुग्ण वाढवू शकते, अशी भीती आहे. उत्तर प्रदेश, पंजाबसह निवडणूक असलेल्या पाच राज्यांत सभांना होणारी गर्दीचीही धास्ती आहे. म्हणूनच केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना पत्र पाठवून चाचण्या वाढवा, असे बजावले आहे.

1. जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी दर जास्त असेल तर राज्यांनी कडक नियम लागू करावेत मिझोरामच्या २ जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर १३.०७% व ११.५६% आहे. ७ राज्यांतील २२ जिल्ह्यांत तो ५-१०% आहे. १०%हून अधिक दर असलेल्या जिल्ह्यांतील रुग्णालयांत जर ४०% बेडवर रुग्ण असतील तर राज्यांनी कडक नियम लागू करावेत. या भागात प्रत्येक संभाव्य रुग्णाची तपासणी व्हावी. लक्षणे नसलेल्या रुग्णांना विलगीकरणात पाठवावे.

2. ख्रिसमस, न्यू इयरच्या पार्ट्यांना कमीत कमी गर्दी व्हावी, राज्यांनी रात्रीची संचारबंदी लावावी रात्री संचारबंदी, लोकांनी एकत्र येण्यावर कडक बंदी असायला हवी. कार्यालयात मर्यादित कर्मचारी बोलवा. सार्वजनिक वाहनांतून मर्यादित प्रवासी असावेत. कंटेनमेंट झोन तयार करा. याचे काटेकोर पालनही व्हायला हवे. ज्या भागात संसर्ग वाढत आहे तेथे सर्व पॉझिटिव्ह रुग्णांच्या नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग व्हायला हवे.

जम्मू-काश्मीर हिमाचलपेक्षाही पुढे

राज्य दोन्ही डोस एक डोस
जम्मू-काश्मीर 72.70% 86.50%
हिमाचल 72.10% 77.10%
गुजरात 65.00% 73.80%
मध्य प्रदेश 63.60% 69.10%
कर्नाटक 58.10% 75.30%
केरळ 55.40% 71.40%
दिल्ली 47.40% 67.30%

5 राज्यांत 40% लोक लस न घेतलेले

राज्य दोन्ही डोस एक डोस
पंजाब 29.40% 55.70%
झारखंड 29.40% 51.50%
उत्तर प्रदेश 32.10% 59.90%
बिहार 36.30% 54.40%
प. बंगाल 40.20% 70.00%
छत्तीसगड 41.90% 63.60%
हरियाना 42.70% 65.50%

दोन्ही डोस देण्यात चीन (83%), कॅनडा (77%), इटली (74%), जर्मनी (70%), अमेरिका (62%) आणि ब्रिटन (61%) सर्वांत आघाडीवर. इस्रायल दुसऱ्यांदा बूस्टर डोस देण्यासाठी सज्ज आहे. म्हणजे चौथा डोसही येथे दिला जाईल. ८० देशांत आता असे बूस्टर डोस दिले जात आहेत.- डॉ. रमण गंगाखेडकर, माजी शास्त्रज्ञ, आयसीएमआर

Previous articleभ्रातृ मंडळाने उभारला समाजभूषण स्व. वि. मा. नारखेडे यांचा अर्धाकृती पुतळा
Next article#Maharashtra । मुख्यमंत्र्यांनी जाबबदाऱ्यांचे वाटप केले पाहिजे- देवेंद्र फडणवीस
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).