Home Omicron देशात ओमायक्रॉन बाधितांचा आकडा 200 पार; महाराष्ट्र -दिल्लीत सर्वाधिक संक्रमित रुग्ण

देशात ओमायक्रॉन बाधितांचा आकडा 200 पार; महाराष्ट्र -दिल्लीत सर्वाधिक संक्रमित रुग्ण

516
देशात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या 202 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. सर्वाधिक प्रभावित राज्यांमध्ये दिल्ली आणि महाराष्ट्राचा समावेश आहे. दोन्ही राज्यात ओमायक्रॉनची 54-54 प्रकरणे आढळून आली आहेत. आज ओडिशामध्ये 2 नवीन संक्रमित आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 5,356 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यासोबतच ओमायक्रॉनचे 77 रुग्ण बरे झाले आहेत.

गुजरातमध्ये ओमायक्रॉनची दहशत, 8 जिल्ह्यांमध्ये 31 डिसेंबरपर्यंत रात्रीचा कर्फ्यू वाढवला
ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे गुजरात सरकारने राज्यातील 8 प्रमुख शहरांमध्ये रात्रीचा कर्फ्यू 31 डिसेंबरपर्यंत वाढवला आहे. कर्फ्यूची वेळ सकाळी 1 ते पहाटे 5 पर्यंत असेल. यामध्ये अहमदाबाद, गांधीनगर, सुरत, राजकोट, वडोदरा, भावनगर, जामनगर आणि जुनागढचा समावेश आहे.

आदेशानुसार, रेस्तरॉँ त्यांच्या बसण्याच्या क्षमतेच्या फक्त 75% वापरु शकतात. त्याचबरोबर लग्नसमारंभात ४०० लोकांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. रविवारी राजकोट जिल्ह्यात राज्यातील पहिला ओमायक्रॉन संक्रमित आढळला. सध्या गुजरातमध्ये 11 ओमायक्रॉन संक्रमित आढळले आहेत.

Previous articleमुख्यमंत्र्यांची प्रकृती ठणठणीत अधिवेशनात सहभागी होणार, उद्योगमंत्री सुभाष देसाईंचा निर्वाळा
Next articleOmicron । धोक्याची घंटा! ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे सर्व राज्यांना पत्र; वॉर रूम सक्रिय करण्याची सूचना
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).