Home Maharashtra Nagpur MLC Election । चंद्रशेखर बावनकुळे विजयी, 278 मतांचा कोटा केला पूर्ण,...

Nagpur MLC Election । चंद्रशेखर बावनकुळे विजयी, 278 मतांचा कोटा केला पूर्ण, अकोलात भाजपचे खंडेलवाल विजयी

535
नागपूर ब्युरो : महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूरच्या जागेवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला आहे. छोटू भोयर यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसनं पाठिंबा दिलेला त्यांचा पराभव झाला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मतं मिळाली आहेत. काँग्रेस समर्थित उमेदवार 186 मतं मिळाली आहेत. तर, छोटू भोयर यांना 1 मिळालं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी 278 मतांचा कोटा पूर्ण केला आहे.

नागपूरच्या जागेवर भाजपनं चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी दिली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे यांच्या विजयासाठी परफेक्ट प्लॅनिंगला यश आलं आहे.चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मतं मिळाल्याचं स्पष्ट झाल्यानं महाविकास आघाडीची मतं फुटल्याचं समोर आलं आहे.

भाजपमधून आलेले नगरसेवक डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना काँग्रेसकडून तिकीट देण्यात आले होते. काँग्रेसनं थेट पक्षाचा नगरसेवक फोडून त्यांना उमेदवारी दिल्यानं भाजपनं आपले नगरसेवक सहलीवर पाठवले. मतदान फुटू नये म्हणून भाजपकून सतर्कता बाळगण्यात आली होती. मात्र,मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रक काढत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. काँग्रेसच्या नेत्यांमध्येच उमेदवारीवरुन दोन गट पाहायला मिळाले. त्यामुळं काँग्रेसमधील नियोजनातील गडबड भाजपच्या पथ्यावर पडली असून त्यांना भाजपच्या 318 मतांपेक्षा जास्त मिळाली आहेत.

नागपूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघ भाजपकडे होती. भाजपनं यावेळी गिरीश व्यास यांच्याऐवजी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी दिली होती. काँग्रेसनं सुरुवातीला भाजप नगरसेवक छोटू भोयर यांना फोडत आक्रमक चाल खेळली. मात्र, त्यानंतर काँग्रेस तितकी आक्रमक राहिली नाही. मतदार फुटू नये म्हणून भाजपनं मतदारांना सहलीवर पाठवलं. मतदारांना सहलीवर पाठवत मतदार एकत्रित ठेवत मतदार फुटणार नाहीत याची काळजी भाजपकडून घेण्यात आली. यानिमित्तानं भाजपनं नागपूरची जागा राखली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयानं अत्यंत आनंद झाला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी संयम ठेवला त्याचं त्यांना फळ मिळालं आहे. महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकसुद्धा आता गुप्त पद्धतीनं घ्यावी, म्हणजे त्यांना त्यांची ताकद कळेल. एखाद्या विषयाचा फालुदा कसं करायचं हे नागपूर काँग्रेसनं दाखवून दिलं आहे. आम्ही अत्यंत प्रतिष्ठेची जागा कोल्हापूरची आम्ही सोडली, त्या बदल्यात काँग्रेसनं नागपूरची जागा सोडण्याचं ठरलं होतं. तुम्ही आम्हाला मुंबई बिनविरोध दिली. मात्र, नागपूरची जागा प्रतिष्ठेची केली. एखाद्या निवडणुकीत पोरखेळ कसा असतो हे काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षानं नागपूर निमित्तानं दाखवून दिलं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Previous article#Omicron | महाराष्ट्र में 2 तो गुजरात में ओमिक्रॉन वैरिएंट का 1 नया केस मिला
Next article#Maharashtra । 15 पर्यंत दुसरा डोस न घेतल्यास औरंगाबादकरांना 500 रुपये दंड
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).