Home मराठी वाहतूक नियम मोडल्यास दहापट दंड, शिक्षेसह परवाना निलंबनाचीही तरतूद

वाहतूक नियम मोडल्यास दहापट दंड, शिक्षेसह परवाना निलंबनाचीही तरतूद

692
राज्यात १ डिसेंबरपासून नव्या मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे आता वाहन नियमाचे उल्लंघन केल्यास खूप महागात पडू शकते. त्यानुसार दहापट दंड, तुरुंगवासाची शिक्षा आणि वाहन परवाना निलंबनाची कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.

देशातील वाहन संख्या २७.९६ कोटींवर जाऊन पोहोचली आहे. यात औरंगाबादेतील १५.६४ लाख वाहनांचा समावेश आहे. वाहन गरजेची वस्तू बनले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाहन संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. भीषण रस्ते अपघातात वाढ झाली आहे. पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास होत आहे. यावर नियंत्रण मिळवणे व रस्ते वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात सुधारणा करून अधिनियम २०१९ लागू केला होता. मात्र, त्यात दहापट दंड वाढवले आहेत.

यामुळे सर्व स्तरातून विरोध होऊ लागल्याने अंमलबजावणी रखडली होती. दुसरीकडे कायदा कडक नसल्याने व शिक्षेची तरतूद नाममात्र असल्याने मोटार वाहन नियमांचे सर्रास उल्लंघन करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. याला आळा घालून शिस्त निर्माण करण्यासाठी नव्या कायद्याची अंमलबजावणी होणे नितांत गरजेचे असल्याने सरकारने १ डिसेंबरपासून नव्या सुधारणांसह कायदा लागू केला आहे. त्याची प्रत्येक आरटीओ, वाहतूक पोलिस विभागाने अंमलबजावणी करावी, यासाठी गृह (परिवहन) विभागाचे कक्ष अधिकारी भि. ओ. ठाकूर यांनी आदेश जारी केले आहेत. आता वाहन चालवताना नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागू शकतो. याचबरोबर वाहन परवाना निलंबन, तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते.

नवीन परिवहन कायद्यात अशी आहे शिक्षेची व दंडाची तरतूद

– विनापरवाना वाहन चालवणे ५०० ते ५ हजार रुपये दंड
– परवाना रद्द असताना वाहन चालवणे ५०० ते १० हजार रुपये
– वेगमर्यादेचे पालन न करणे दुचाकी व तीनचाकीसाठी १ हजार रुपये, मोठ्या
– वाहनांनाही भरघोस १ ते ४ हजार दंडाची तरतूद आहे.
– शर्यत लावणे, वेग अजमावणे ५ ते १० हजार
– ओव्हरलोड २० हजार रुपये प्रतिटन
– सीटबेल्ट नसणे २०० ते १ हजार
– ट्रीपल सीट २०० ते १ हजार
– कर्कश हॉर्न वाजवणे ५०० ते १ हजार
– अत्यावश्यक वाहनांना अडवणे, अडथळा आणणे १० हजार
– वाहन बदल केल्यास १ ते २ हजार
– वाहन नंबर प्लेटवर दादा, मामा, बाबा आदी लिहिणे, रिफ्लेक्टर्स नसणे, टेललाइट नसणे १ हजार रुपये दंड
– वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे, चुकीच्या पद्धतीने व्हरटेकिंग केल्यास रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन चालवल्यास १ ते ५ हजार दंड, ६ ते १२ महिने तुरुंगवास, पुन्हा हाच गुन्हा केल्यास १० हजार रुपये दंड व तुरुंगवास.

यासाठीही हाेणार शिक्षा

रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी पार्किंग, वाहतुकीस अडथळा, ट्रिपल सीट वाहन चालवणे, नंबर प्लेटशिवाय वाहन चालवणे, ज्वालाग्रही आणि अत्यंत स्फोटक पदार्थ घेऊन प्रवास करणे, चालू वाहनावर छतावरून बस प्रवास करणे, आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणे आदींसाठी मोठ्या दहापट दंडाची, शिक्षेची तरतूद केलेली आहे.

Previous articleOmicron । मुंबईत 221 कोरोनाबाधितांपैकी ओमायक्रॉनचे केवळ दोन रुग्ण, जनुकीय चाचणीचे निष्कर्ष जाहीर
Next article‘जल जीवन मिशन’अंतर्गत विभागातील 6 हजार 123 गावात नळाद्वारे पिण्याचे पाणी-प्रधान सचिव संजीव जैस्वाल
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).