Home मराठी #Nagpur । मानवाधिकार दिनानिमित्त मानवी साखळी; १२ संघटनांचे आयोजन

#Nagpur । मानवाधिकार दिनानिमित्त मानवी साखळी; १२ संघटनांचे आयोजन

536

नागपूर ब्युरो : शहरातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या १२ सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा संस्था- संघटनांनी एकत्र येत जागतिक मानवाधिकार दिन दक्षिण नागपुरातील प्रभाग ३१ मधील महावीर नगर मैदानावर आज आगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. सहयोग ट्रस्टचे विश्वस्त डॉ.रवींद्र भुसारी आणि ह्युमॅनिटी सोशल फाउंडेशनच्या संचालिका पूजा मानमोडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात मानवी हक्क आणि अधिकारांवर आधारित फलक घेऊन मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलं. सोबत स्केटिंग रॅलीही काढण्यात आली. डॉ. रवींद्र भुसारी, पूजा मानमोडे यांच्यासह राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या जिल्हाध्यक्ष उषाताई इंगळे, रोलर स्पोर्ट्स कोचेस असोसिएशन ऑफ नागपूरचे संस्थापक अध्यक्ष गजेंद्र बनसोड, मानवाधिकार समितीचे डॉ. अभयकुमार बंगालकर, डॉ. लीना निकम आदींची यावेळी मानवाधिकारावर प्रकाश टाकणारी भाषणे झाली.


माझं महावीर नगर सोशल ग्रुपचे अनिल गवारे, पुलक मंचचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मनोज बंड, महावीर युथ क्लबचे गौरव शहाकार, राष्ट्रीय ओबीसी महासंघटना नागपूर शहराच्या अध्यक्ष वृंदाताई ठाकरे, राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे शुभम वाघमारे, अल्कोहॉलिक्स अँनानिमसचे सदस्य देवेंद्रजी, यांच्यासह श्री. महावीर गृहनिर्माण सहकारी संस्था, महावीर सांस्कृतिक व क्रीडा मंडळ आणि इतर संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी सैन्यदल प्रमुख जनरल बिपीन रावत यांना मौन पाळून सामुहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जुईली भुसारी आणि भावेश मानमोडे यांनी विशेष परिश्रम घेतले. भरतेश नखाते, राजश्री भुसारी, निर्मला मानमोडे, नंदा मालखेडे, देवेंद्र कापसे, उर्मिला मानमोडे, अबोली येनूरकर, रुपाली टिचकुले, प्रमिला मानमोडे, स्वाती अहिरराव, स्नेहा कोठारी,पिंकी चांदपूरकर, प्रसाद मानमोडे, कपिल कावळे, कौस्तुभ वणवे,पियुष सुरकार,रोहन सातपैसे,जय नांदूरकर,ललित साँदेकर यांच्यासह प्रभाग ३१ मधील नागरिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.