Home Maharashtra मुख्यमंत्री 21 दिवसांनी वर्षा बंगल्यावर परतले, पुढील काही दिवस घरूनच काम करणार

मुख्यमंत्री 21 दिवसांनी वर्षा बंगल्यावर परतले, पुढील काही दिवस घरूनच काम करणार

528

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एचएन रुग्णालयातून गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टर अजित देसाई यांनी तशी घोषणा केली. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असला तरी पुढील काही दिवस त्यांना घरूनच काम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांना मान व मणक्याचा त्रास होत होता. दिवाळीच्या दिवसांत त्यांचा हा त्रास वाढला. एका कार्यक्रमात तर ते मानेला पट्टा लावून बसल्याचे दिसले. डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्यांना एच. एन. रिलायन्स रुग्णालयात १० नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले. डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी त्यांच्यावर १२ नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया केली.

शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते त्यांचे सुपुत्र व मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह गुरुवारी सकाळी ते वर्षा या शासकीय निवासस्थानी परतले. रुग्णालयातील काळात देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठक व कोरोनाविषयक बैठकाना ऑनलाइन हजेरी लावली होती. आता मुख्यमंत्र्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी पुढचे काही दिवस घरातूनच कामकाज करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

हिवाळी अधिवेशनाला १ ते २ दिवस येणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून लवकर डिस्चार्ज अपेक्षित होता. मात्र मानेची शस्त्रक्रिया झाल्यानंतर रक्ताच्या गुठळ्याचे नवे प्रकरण उद्भभवले. त्याची शस्त्रक्रियाही झाली. त्यामुळे त्यांचा रुग्णालयातील मुक्काम लांबला. २२ डिसेंबर पासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आहे. मुख्यमंत्री अधिवेशनाला दिवसातून १ ते २ तास उपस्थिती लावणार असल्याचे समजते.

Previous articleमुंबई विमानतळावर आलेले 10 प्रवासी कोरोनाग्रस्त; आज येणार जीनोम सिक्वेन्सिंग अहवाल
Next article#Maharashtra | ओमायक्रॉनची लक्षणे सामान्य; घाबरण्याचे कारण नाही : टोपे, 28 नमुने तपासणीला
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).