Home कोरोना #Nagpur । ‘हर घर दस्तक’ अभियानाला उत्तम प्रतिसाद, ४.९६ लाख लसीकरण डोज...

#Nagpur । ‘हर घर दस्तक’ अभियानाला उत्तम प्रतिसाद, ४.९६ लाख लसीकरण डोज पूर्ण

444

नागपूर ब्युरो : नागपूर शहरातील सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण करून कोरोनाच्या संभाव्य लाटेपासून बचाव व्हावा या उद्देशाने शहरात लसीकरणासाठी विशेष अभियान चालविले. प्रत्येक नागपूरकर हा लसवंत व्हावा यासाठी मनपाद्वारे १५०च्या वर लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली. याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर दस्तक’ या विशेष मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. या अभियानालाही नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये या अभियानाद्वारे तब्बल ४ लाख ९६ हजार २८४ लसीकरणाचे दोन्ही डोज पूर्ण झाले आहेत. लसीकरणाबाबत दाखविलेली जागरूकता, घेतलेला पुढाकार आणि मनपाला केलेल्या सहकार्याबद्दल मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी समस्त नागपूरकरांचे आभार मानून अभिनंदन सुद्धा केले आहे.

कोरोनाच्या संकटामध्ये मास्क, सुरक्षित अंतर, सॅनिटाजर, हात धुणे या सुरक्षात्मक नियमांच्या पालनासह लसीकरण हे अत्यावश्यक आहे. कोरोनाच्या संभाव्य लाटेपासून नागपूरकरांचा बचाव व्हावा यादृष्टीने मनपाद्वारे लसीकरणावर विशेष भर देण्यात आला. शहरातील प्रत्येक झोनमध्ये प्रभागनिहाय लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली. जे नागरिक लसीकरण केंद्रावर जाउ शकत नाही. अशांसाठी ‘हर घर दस्तक’ अभियानाद्वारे विशेष व्यवस्था सुद्धा करण्यात आली.

‘हर घर दस्तक’ अभियानाद्वारे मनपाची आरोग्य चमू घरोघरी जाउन लसीकरण झालेल्यांची शहानिशा करून घेत आहे. यामध्ये जे लोक अद्यापही लसीकरणापासून वंचित आहेत, त्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. अनेक अफवा, शंका यामुळेही अनेक जण लसीकरणापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. त्यादृष्टीने मनपाच्या पथकाद्वारे नागरिकांच्या संपूर्ण शंकांचे निरसन करून त्यांना लस घेण्याचे फायदे पटवून दिले जातात. यानंतर लसीकरणासाठी सहमती दर्शविणा-या व्यक्तींचे त्यांच्याच घरी लसीकरण करून देण्यात येत आहे.

१ ते ३० नोव्हेंबर दरम्यान मागील महिनाभर मनपाच्या आरोग्य पथकाद्वारे करण्यात आलेल्या कार्याचे फलीत आज दिसून येत आहे. महिनाभरात घरोघरी जाउन पथकाने तब्बल ४ लाख ९६ हजार २८४ लसीकरणाचे डोज दिले आहेत. यामुळे नागपूर शहरातील लसीकरणाचे प्रमाण वाढले आहेत. शहरात लसीकरणाच्या डोजेसचा टप्पा ३१ लाखांकडे वाटचाल करीत आहे. यामध्ये नागरिकांना घरी जाउन लस घेण्यास प्रोत्साहित करणा-या ‘हर घर दस्तक’ अभियानाचे मोठे योगदान आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये ‘हर घर दस्तक’ अभियानांतर्गत २ लाख ५२ हजार ८५० जणांनी पहिला डोज घेतला तर २ लाख ४३ हजार ४३४ जणांनी दोन्ही डोज पूर्ण केले आहेत.

कोरोनाच्या संकटापासून बचावामध्ये कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरण हे अत्यावश्यक असून यादृष्टीने मनपाद्वारे सर्व प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना नागपूरकरांद्वारे उत्तम प्रतिसाद मिळणे ही सकारात्मक बाब आहे. नागरिकांनी लसीकरण झाल्यानंतरही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मास्क ही अत्यावश्यक बाब आहे. घराबाहेर निघताना मास्क लावूनच निघावे. तसेच ज्यांनी पहिला डोज घेतला व दुसरा डोज घेण्याची तारीख येउनही तो घेतला नाही त्यांनी कुठल्याही शंका, अफवांकडे लक्ष न देता प्राधान्याने आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे. कोव्हिडच्या संकटात आपली सुरक्षितता ही इतरांसाठीही महत्वाची आहे. त्यामुळे प्रत्येकाने पुढेही आपली वागणूक जबाबदारीची ठेवावी, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी यानिमित्ताने केले आहे.

Previous article#Nagpur । मनपा विद्यार्थ्यांसाठी ‘संगणक शिक्षण बस’चा शुभारंभ
Next articleमुंबई विमानतळावर आलेले 10 प्रवासी कोरोनाग्रस्त; आज येणार जीनोम सिक्वेन्सिंग अहवाल
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).