Home Health #HealthCamp | पिपळा येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न

#HealthCamp | पिपळा येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न

366
0

नागपूर ब्यूरो: आबाजी भोयर (पाटील) शिक्षण संस्था, छत्रपति युवा बहुदेशीय संस्था व भारतीय जनता पार्टी शाखा पिपळा यांचे संयुक्त विद्यमाने पिपळयात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करन्यात आले होते. त्यामध्ये मोफ़त क्ष-किरण, ईसीजी, रक्तदाब, मधुमेह व नेत्र तपासणी करण्यात आली व निशुल्क चष्म्याचे वाटप करण्यात आले.

शिबिरामध्ये ४०० गावकर्यांनी आपली मोफत चिकित्सा तज्ञांकडून करून घेतले. शिबिराचे उदघाटन गट ग्राम पंचयात पिपळा – घोगलीचे सरपंच नरेश भोयर यांचे हस्ते करण्यात आले.अध्यक्षा म्हणून पंचायत समिती सदस्या वैशाली भोयर, प्रमुख अतिथी उपसरपंच प्रभु भेंडे, ग्राम पंचायत सदस्य प्रकाश भोयर, वनिता कावळे, किरण बोढारे, राजेंद्र राजूरकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निखिल भोयर, उमेश भोयर, वैभव मेंढे, अंकित येरणे, महिंद्रा मारसिंगे, अमर पिसार, सौरभ कावळे, रोहित भोयर, रणजीत भोयर, विवेक येरणे, साहिल भोयर, हिमांशु महाजन, तेजस भोयर, क्रिश देउलकर, वैभव येरणे, तन्मय भोयर, अमोल तलेकर आदिनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here