Home Election MLC ELECTION । नागपूर आणि अकोला थेट लढत होणार, नागपुरात बावनकुळे, भोयर...

MLC ELECTION । नागपूर आणि अकोला थेट लढत होणार, नागपुरात बावनकुळे, भोयर यांच्यात सामना

655

नागपूर ब्युरो : चार विधानपरिषद निवडणुकीच्या जागांपैकी कोल्हापूर आणि नंदूरबार-धुळे बिनविरोध होणार आहे. परंतु, नागपूर आणि अकोला येथील निवडणुका होणार आहे. नागपुरात काँग्रेसचे छोटू भोयर यांनी उमेदवारी मागे घेतली नाही. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे छोटू भोयर यांच्यात सामना होणार आहे. दरम्यान, काँग्रेसनं डमी उमेदवार प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी अर्ज मागे घेतला. तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ होती.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीचा घोडेबाजार थांबवण्यासाठी बिनविरोध निवडणूक घेता येईल, या यासाठी प्रयत्न केले. कोल्हापूर आणि नंदूरबार-धुळे येथील जागांबाबत एकमत झाले. परंतु, नागपूर आणि अकोला-वाशीम-बुलडाणा विधान परिषदेच्या जागांबाबत एकमत होऊ शकले नाही. त्यामुळं या दोन्ही ठिकाणी घोडाबाजाराला उधाण येणार आहे. आपले उमेदवार फुटू नये, यासाठी नगरसेवकांना आतापासून सहलीला नेण्याचं प्लॅनिंग भाजप आणि काँग्रेसनं सुरू केलंय.

नागपूर जिल्हा विधानपरिषद निवडणुकीत 556 मतदार आहेत. यात 60 मतांनी भाजपचं पारडं जड आहे. आम्ही 400 पेक्षा जास्त मतांनी ही निवडणूक जिंकू, असा विश्वास भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रविण दटके यांनी व्यक्त केला होता. नागपूर जिल्ह्यात विधानपरिषद निवडणुकीत एकूण 556 मतदार आहेत. खबरदारी म्हणून काँग्रेसं आपल्या नगरसेवकांना सुरक्षितस्थळी नेणार असल्याची माहिती आहे. भाजपनंही तशी तयारी केली आहे. नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपकडे जास्त नगरसेवक असले, तरीही काँग्रेस आणि भाजपकडूनंही खबरदारी घेतली जात आहे.

अकोल्यात बाजोरिया-खंडेलवाल यांच्यात लढत

अकोला, वाशीम, बुलढाणा या -स्थानिक स्वराज्य संस्थेत गेल्या तीन टर्मपासून गोपिकिशन बाजोरिया यांचे वर्चस्व आहे. पण, यावेळी ते महाविकास आघाडीकडून या निवडणूक रिंगणात उतरले. भाजपाकडून वसंत खंडेलवाल यांची उमेदवारी असल्यानं या निवडणुकीत चुरस वाढली आहे.

Previous article#HomeLoan | दि धरमपेठ महिला मल्टीस्टेट को-ऑपरेटिव सोसायटी की महिलाओं के लिए हैप्पी होम लोन स्कीम
Next articleOmicron Variant | जानिए दक्षिण अफ्रीका में मिले नए वेरिएंट के बारे में अब तक क्या-क्या पता चला?
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).