Home Covid-19 #Covid । कर्नाटकात मेडिकल कॉलेजची पार्टी बनली कोरोना ‘सुपरस्प्रेडर’, एकाच दिवसात रुग्ण...

#Covid । कर्नाटकात मेडिकल कॉलेजची पार्टी बनली कोरोना ‘सुपरस्प्रेडर’, एकाच दिवसात रुग्ण झाले तिप्पट

380

कर्नाटकातील धारवाडमधील एका वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या 66 वरून 182 वर पोहोचली आहे. अलीकडेच कॉलेजमध्ये फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, त्यानंतर कोरोनाचा उद्रेक झाला. अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, संक्रमित बहुतेकांना कोरोनाविरूद्ध लसीचे दोन्ही डोस देण्यात आले होते.

पार्टीनंतर कोरोना पसरण्याच्या भीतीने महाविद्यालयातील 300 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांची चाचणी घेण्यात आली होती. गुरुवारी रिपोर्टमध्ये ६६ विद्यार्थी आणि शिक्षक पॉझिटिव्ह आढळले. या सर्वांचे संपूर्ण लसीकरण करण्यात आले होते. आज आणखी लोकांची चाचणी घेतली जाईल.

अधिका-यांनी सांगितले की, बाधितांना महाविद्यालयाच्या आवारात क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे आणि खबरदारी म्हणून दोन वसतिगृहे सील करण्यात आली आहेत. राज्य आरोग्य विभाग आज कॉलेज आणि हॉस्पिटलमधील 3,000 हून अधिक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या चाचण्या (क्लिनिकल आणि नॉन-क्लिनिकल) घेणार आहे.

Previous article#StockMarket । सेन्सेक्समध्ये 1300, निफ्टीत 400 पेक्षा अधिक पॉइंटने घट; ही आहेत मार्केट कोसळण्याची कारणे
Next article#HomeLoan | दि धरमपेठ महिला मल्टीस्टेट को-ऑपरेटिव सोसायटी की महिलाओं के लिए हैप्पी होम लोन स्कीम
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).