Home BJP #Nagpur। माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

#Nagpur। माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

492

नागपूर ब्युरो : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी मंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरातल्या आकाशवाणी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयातून भाजपनं रॅली काढली. बावनकुळेंचा अर्ज भरताना भाजपनं चांगलंच शक्ती प्रदर्शन केलं. भाजपनं माझ्यावर विश्वास दाखविला. त्याबद्दल पक्षाचे आभार मानतो. ही निवडणूक 100 टक्के जिंकणार असल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांना यावेळी केलाय. तसेच विधिमंडळात जिल्ह्याचे, विदर्भाचे तसेच राज्याचे प्रश्न मांडणार असल्याचं देखील ते म्हणाले.

Previous article#defence | मेजर विभूति शंकर और नायब सूबेदार सोमबीर को शौर्य चक्र, अभिनंदन का वीर चक्र से सम्मान
Next article#Madhyapradesh । मध्य प्रदेशातील शाळा संचालकाने पत्नी साठी बांधले ताजमहालसारखे घर
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).