Home Maharashtra Amruta Fadnavis | ‘आओ कुछ तूफ़ानी करते है’, राजकीय बोलणार की नवी...

Amruta Fadnavis | ‘आओ कुछ तूफ़ानी करते है’, राजकीय बोलणार की नवी घोषणा करणार?

402

मुंबई ब्युरो : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. कधी गाणं, तर कधी सोशल मीडियावरील त्यांचे ट्विट्स. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी नुकतेच एक ट्वीट करत एक घोषणा केली आहे. मात्र, या ट्वीटवरून त्या नेमकं काय करणार आहेत, हे स्पष्ट होत नाहीये.

‘आओ कुछ तूफ़ानी करते है, कल शाम…. मी पुन्हा येत आहे !!!’, असं त्यांनी ट्वीट केलं आहे. आता मिसेस फडणवीस राजकीय बोलणार की, नव्या गाण्याचा आगामी अल्बमची घोषणा करणार, याबद्दल कयास बांधले जात आहेत.

भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. सध्या सुरु असणाऱ्या घडामोडींवर त्या आपली मते मांडत आहेत. यामुळेच अमृता फडणवीस सध्या प्रचंड चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या खळबळजनक आरोपांनंतर अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांच्याच छत्रछायेखाली ड्रग्ज रॅकेट सुरु होते. यापैकी एका ड्रग्ज पॅडलरने अमृता फडणवीस यांच्या एका गाण्यासाठी वित्तपुरवठा केला होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.

या आरोपांवर अमृता यांनी ट्विटच्या माध्यमातून भाष्य केले. चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते !, असे अमृता यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) नदी स्वच्छता मोहीमेविषयी गाणं केलं होतं. त्या गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा (Jaideep Rana) आहे. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत, असा दावा नवाब मलिकांनी केला होता. त्यानंतर आता अमृता फडणवीस यांचे हे नवे ट्वीट देखील खूप चर्चेत आले आहे.

अमृता फडणवीस या एक गायिका देखील आहेत. त्यांच्या आवाजातील अनेक गाणी चाहत्यांच्या भेटीस आली होती. अमृता फडणवीस यांचे गायनकौशल्य संपूर्ण राज्याला परिचित आहे. यापूर्वीही त्यांची अनेक गाणी सोशल मीडियावर हिट ठरली आहेत. अमृता फडणवीस यांनी भाऊबीजेनिमित्त एक गाणे रिलीज केले होते. ‘तिला जगू द्या’ या गाण्याचा एक व्हिडीओ अमृता यांनी आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन पोस्ट केला होता. या व्हिडीओला दोन दिवसांमध्ये दहा लाख व्ह्यूज मिळाले होते. त्यांनी याआधी देखील अनेक गाणी गायली आहेत. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अमृता फडणवीस यांच्या गाण्याचा एक अल्बम देखील रिलिज झालेला आहे.

यानंतर, त्यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या (Valentine’s day) मुहूर्तावर सोशल मीडियावर एक गाणे शेअर केले होते. ‘ये नयन डरे डरे’ असे या गाण्याचे शब्द आहेत. गणेशोत्सवादरम्यान त्यांनी गणेश वंदना देखील गायली होती. त्यामुळे जर त्यांच्या या ट्वीटचा अर्थ त्यांचे नवे गाणे असेल तर ही त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

Previous articleSIDBI आणि Google चा सामंजस्य करार, लघू उद्योगांना 25 लाख ते 1 कोटींपर्यंत कर्ज मिळणार
Next article#Akola | कृषि कानून के विरोध में किए गए आंदोलन में मृत किसानों को शहीदों का दर्जा मिलें
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).