Home Maharashtra @nawabmalikncp । नवाब मलिक म्हणाले- ड्रग्ज प्रकरणात “उडता महाराष्ट्र” करण्याचाच गेम होता

@nawabmalikncp । नवाब मलिक म्हणाले- ड्रग्ज प्रकरणात “उडता महाराष्ट्र” करण्याचाच गेम होता

475

मुंबई ब्युरो : आर्यन खानच्या (Aryan Khan) किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज असल्याचा मोठा आरोप मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik Press)केला आहे. कोर्ट प्रोसिडिंगमध्ये एक बाब वारंवार समोर आली आहे की प्रतीक गाभा आणि अमीर फर्निचरवाला यांच्या माध्यमातून आर्यनला क्रूझवर आणण्यात आलं. हे सगळं प्रकरण किडनॅपिंग आणि खंडणी वसुली करण्याचं आहे. किडनॅपिंगचा मास्टर माईंड मोहित कंबोज (Mohit Kamboj) आहे. मोहित कंबोज हा आपलं हॉटेल चालवण्यासाठी शेजारी असणाऱ्या हॉटेलवर छापेमारी घडवून आणतो. यामध्ये समीर वानखेडे (Sameer Wankhede) त्याला मदत करतो, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक यांनी म्हटलं की, 7 तारखेला मोहित कंबोज आणि समीर वानखेडे ओशिवरा कब्रस्तान येथे भेटले होते. त्यांचं नशीब चांगलं होतं की त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ मिळाला नाही. वानखेडे यांना सांगू इच्छितो की मी कोणाला पाठ करून पत्रकार परिषदेसाठी पाठवत नाही, असंही ते म्हणाले.

नवाब मलिकांनी म्हटलं आहे की, मोहित कंबोज हा 1700 कोटी रुपये भ्रष्टाचार करणारा हा व्यक्ती आहे. सध्या भाजपमध्ये असलेले आणि पूर्वी काँग्रेसमध्ये असणाऱ्या एका नेत्यामागे हा फिरत असायचा. त्यानंतर सरकार बदललं आणि तो भाजपमध्ये गेला. दीड वर्षापूर्वी सीबीआयची छापेमारी करण्यात आली. आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे प्रकरण दाबण्यात आले.

नवाब मलिक यांनी म्हटलं की, 18 कोटींचं प्रकरण समोर आलं आहे. प्रभाकर सैल याने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन जबाब दिला आहे. सध्या समीर वानखेडे यांना वाचण्यासाठी मोहित कंबोज आणि सॅम डिसुझा प्रयत्न करत आहेत. ते त्यांच्या प्रायव्हेट आर्मीचा भाग आहेत.

नवाब मलिक यांनी म्हटलं की, माझ्यावर आरोप करण्यात येतो आहे की मी प्रभाकर सैलला शिकवून पोलीस ठाण्यात पाठवलं. परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो 22 तारखेला मनोज संसारे यांचा मला फोन आला. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं के पी गोसावी आणि त्यांचा साथीदार आत्मसमर्पण करणार आहेत. मी याबाबत मुख्यमंत्री यांना देखील यांना सांगितलं. मुख्यमंत्री यांनी डी जी पांडे यांना सांगितलं. त्यानंतर मला त्यांचा फोन आला. त्यानंतर पालघरची टीम मुंबईत येऊन थांबली होती. संसारे यांना फोन केला तर ते बोलले त्यांचा फोन बंद लागतो. त्यानंतर मात्र मी परत डीजींना फोन केला नाही. त्यानंतर दुपारी माझ्याकडे दुपारच्या सुमारास मनोज संसारे आणि प्रभाकर सैल आले. त्यावेळी त्यांनी सांगितलं की मला पुणे क्राईम ब्रँचने अटक केली होती. त्यांनी माझं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं होतं. त्यांनतर मी मुंबईत आलो, असं मलिक म्हणाले.

सॅम डिसुझाने हवाला मार्फत दिल्लीला पैसे पाठवले

नवाब मलिकांनी सांगितलं की, एक केस झाली होती. व्हीट बॅकरी केस मध्ये सचिन टोपे आणि त्याच्या बायकोला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात सॅम डिसूजाला 23 जूनला एक नोटीस देण्यात आली होती. एनसीबीच्या वतीने हजर होण्यासाठी मात्र तो आज अखेर तो आलेला नाही. 23 जून पासून आज अखेर त्याची अटक का झाली नाही? 5 महिने याला अटक झाली नाही आणि आता तो समीर वानखेडे यांना क्लिनचिट देत आहे. हा दोन व्यक्तींसोबत काम करतो एक राजीव बजाज आणि दुसरा आहे प्रदीप नाम्बियार. हे दोघे पत्रकार आहेत. हे दोघे वानखेडेच्या प्रायव्हेट आर्मीचे भाग आहेत. सॅम डिसुझाने हवाला मार्फत दिल्लीला पैसे पाठवले. तो हवाला सोबत फोनवर बोलत होता की मला हवालाची पावती द्या. हवालावाला त्याला म्हणतो हवालाची कधी पावती मिळते का?

नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

1. कोर्ट प्रोसिडिंगमध्ये एक बाब वारंवार समोर आली आहे की प्रतीक गाभा आणि अमीर फर्निचरवाला यांच्या माध्यमातून आर्यनला क्रूझवर आणण्यात आलं. हे सगळं प्रकरण किडनॅपिंग आणि खंडणी वसुली करण्याचं आहे. किडनॅपिंगचा मास्टर माईंड मोहित कंबोज (Mohit Kamboj) आहे. मोहित कंबोज हा आपलं हॉटेल चालवण्यासाठी शेजारी असणाऱ्या हॉटेलवर छापेमारी घडवून आणतो. यामध्ये समीर वानखेडे (Sameer Wankhede) त्याला मदत करतो.

2. 7 तारखेला मोहित कंबोज आणि समीर वानखेडे ओशिवरा कब्रस्तान येथे भेटले होते. त्यांचं नशीब चांगलं होतं की त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ मिळाला नाही. वानखेडे यांना सांगू इच्छितो की मी कोणाला पाठ करून पत्रकार परिषदेसाठी पाठवत नाही.

3. मोहित कंबोज हा 1700 कोटी रुपये भ्रष्टाचार करणारा हा व्यक्ती आहे. सध्या भाजपमध्ये असलेले आणि पूर्वी काँग्रेसमध्ये असणाऱ्या एका नेत्यामागे हा फिरत असायचा. त्यानंतर सरकार बदललं आणि तो भाजपमध्ये गेला. दीड वर्षापूर्वी सीबीआयची छापेमारी करण्यात आली. आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे प्रकरण दाबण्यात आले.

4. 18 कोटींचं प्रकरण समोर आलं आहे. प्रभाकर सैल याने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन जबाब दिला आहे. सध्या समीर वानखेडे यांना वाचण्यासाठी मोहित कंबोज आणि सॅम डिसुझा प्रयत्न करत आहेत. ते त्यांच्या प्रायव्हेट आर्मीचा भाग आहेत.

5. माझ्यावर आरोप करण्यात येतो आहे की मी प्रभाकर सैलला शिकवून पोलीस ठाण्यात पाठवलं. परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो 22 तारखेला मनोज संसारे यांचा मला फोन आला. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं के पी गोसावी आणि त्यांचा साथीदार आत्मसमर्पण करणार आहेत. मी याबाबत मुख्यमंत्री यांना देखील यांना सांगितलं. मुख्यमंत्री यांनी डी जी पांडे यांना सांगितलं. त्यानंतर मला त्यांचा फोन आला. त्यानंतर पालघरची टीम मुंबईत येऊन थांबली होती. संसारे यांना फोन केला तर ते बोलले त्यांचा फोन बंद लागतो. त्यानंतर मात्र मी परत डीजींना फोन केला नाही. त्यानंतर दुपारी माझ्याकडे दुपारच्या सुमारास मनोज संसारे आणि प्रभाकर सैल आले. त्यावेळी त्यांनी सांगितलं की मला पुणे क्राईम ब्रँचने अटक केली होती. त्यांनी माझं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं होतं. त्यांनतर मी मुंबईत आलो, असं मलिक म्हणाले.

6. सुनील पाटील याला मी कधीही भेटलो नाही. सुनील पाटील हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही. सुनील पाटील हा भाजपच्या मंत्र्यांसोबत फिरत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होताना पाहिला मिळत आहेत. तो कोणत्या पार्टीचा व्यक्ती आहे हे मी बोलत नाही, असं मलिक म्हणाले. सुनील पाटील हा समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीचा भाग आहेत. 6 तारखेला पाहिल्यादा मला सुनील पाटीलचा फोन आला. तो येतो बोलला त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील फोन आला मात्र तो आला नाही. तो आज येणार होता परंतु आज अखेर तो आलेला नाही, असंही मलिक म्हणाले.

7. एक केस झाली होती. व्हीट बॅकरी केस मध्ये सचिन टोपे आणि त्याच्या बायकोला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात सॅम डिसूजाला 23 जूनला एक नोटीस देण्यात आली होती. एनसीबीच्या वतीने हजर होण्यासाठी मात्र तो आज अखेर तो आलेला नाही. 23 जून पासून आज अखेर त्याची अटक का झाली नाही? 5 महिने याला अटक झाली नाही आणि आता तो समीर वानखेडे यांना क्लिनचिट देत आहे. हा दोन व्यक्तींसोबत काम करतो एक राजीव बजाज आणि दुसरा आहे प्रदीप नाम्बियार. हे दोघे पत्रकार आहेत. हे दोघे वानखेडेच्या प्रायव्हेट आर्मीचे भाग आहेत. सॅम डिसुझाने हवाला मार्फत दिल्लीला पैसे पाठवले. तो हवाला सोबत फोनवर बोलत होता की मला हवालाची पावती द्या. हवालावाला त्याला म्हणतो हवालाची कधी पावती मिळते का?

8. मी चुकीच्या लोकांच्या विरोधात लढत आहे. ड्रग्जच्या नावावर जी हजारो कोटी रुपयांची जी वसुली होत आहे त्यांच्या विरोधात मी लढत आहे.

9. मी एनसीबीच्या डीजी साहेबांना विचारणार आहे की त्यांनी एक स्टेटमेंट 2 तारखेला दिल होत की पहिल्यांदा समुद्रात कारवाई करण्यात आली होती. परंतु त्यांच्या माहितीसाठी सांगतो कारवाई समुद्रात झाली नाही. अगोदरच कारवाई केली होती. ज्या केस मध्ये चार्जशीट झाली आहे त्या केसची चौकशी हे काय करणार आहेत. एक तर त्यांना सत्य समोर आणायचं आहे नाही तर त्यांना मला घाबरवायचं आहे. मी त्यांना सांगतो मी घाबरणारा नाही.

10. माझ्या जावयाने म्हटलं आहे की जर हे अशाप्रकारे चुकीच्या कारवाया करत असतील तर ही लढाई अशीच सुरू ठेवा. जर मला 20 वर्षे तुरुंगात राहावं लागलं तरी हरकत नाही, मात्र यांना सोडू नका.

#Maharashtra । दुर्घटनाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश; मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत

Previous article@WhatsApp | कई डिवाइस पर अकाउंट लॉग इन, इंटरनेट बंद होने पर भी नहीं होगा लॉगआउट
Next article#ChhathPuja2021 | जानिए छठी मैय्या को प्रिय हैं कौन से 6 फल? डाले में जरूर रखें
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).