Home Diwali #Diwali । पंतप्रधान मोदी सह नितीन गडकरी, राहुल गांधींनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

#Diwali । पंतप्रधान मोदी सह नितीन गडकरी, राहुल गांधींनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

420
आज देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतांना पाहायला मिळत आहे. त्यापार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेतेमंडळींनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत हिंदीमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे.

आयुष्यामध्ये सुख, समाधान आणि संपन्नता येवो, अशी मी प्रार्थना करतो. दिवाळीच्या या पवित्र दिनानिमित्त मी देशातील नागरिकांना शुभेच्छा देतो. माझी इच्छा आहे की, हे वर्ष तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख, संपन्नता आणि सौभाग्य घेऊन येवो. अशी शुभेच्छा मोदी यांनी देशवासियांना दिली आहे.

तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “सर्वांच्या दिवाळीचा खुप खुप हार्दिक शुभेच्छा. प्रकाश आणि आनंदाचे हे महापर्व सर्वांच्या आयुष्यात उर्जा, प्रकाश, आरोग्य आणि समृद्धीने उजळून निघू दे” अशी शुभेच्छा अमित शहा यांनी दिली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येणारी दिवाळी करोनामुक्तीची ठरेल असा विश्वास व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. येणारी दिवाळी सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो असं गडकरींनी म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. “येणारी दिवाळी कोरोनामुक्तीची ठरेल असा विश्वास मी व्यक्त करतो. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा, देणारी दिवाळी समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो” अशी शुभेच्छा गडकरी यांनी दिली आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “दिव्याचा प्रकाश कोणताही भेदभाव न करता प्रकाश देत राहतो, हाच दिवाळीचा संदेश आहे आपल्या सर्वांची दिवाळी एकमेकांशी भावनिक नाते निर्माण करणारी असो” असे म्हणत राहुल यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राज्यातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “राज्यातील जनतेला ‘दिवाळी’च्या मनःपूर्वक शुभेच्छा! यंदाची दिवाळी सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो, ही दिवाळी करोना व प्रदुषण प्रतिबंधक नियमांचं पालन करुन आरोग्यदायी साजरी करुया. यंदाची दिवाळी राज्याला कोरोनामुक्तीकडे नेणारी ठरो” अशा शुभेच्छा अजित दादा यांनी दिल्या आहेत.

#Diwali | वो स्थान जहां श्रीराम ने चट्टान से निकाला था जल, यहां का पानी आज भी नहीं सूखता

 

Previous article#Diwali | वो स्थान जहां श्रीराम ने चट्टान से निकाला था जल, यहां का पानी आज भी नहीं सूखता
Next article#Diwali । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू-काश्मीरमध्ये जवानांसोबत साजरी करणार दिवाळी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).