Home Legal #Maharashtra | उपमुख्यमंत्र्यांच्या वकिलांचे स्पष्टीकरण, अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच...

#Maharashtra | उपमुख्यमंत्र्यांच्या वकिलांचे स्पष्टीकरण, अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा नोटीसही नाही

424

मुंबई ब्युरो : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणलेली नाही किंवा त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार यांना प्राप्त झालेली नाही. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमात येत असलेले वृत्त निराधार, वस्तुस्थितीशी विसंगत, खोडसाळपणाचे आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसारीत होत असलेल्या बातम्यांचे खंडन करताना त्यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील म्हणाले की, अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच आलेली नाही किंवा त्यासंदर्भात नोटीसही बजावण्यात आलेली नाही. आयकर विभागाकडून काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. त्या पत्राला योग्य ते उत्तर देण्यात येईल.

प्रशासकीय आणि कायदेशीर मार्गाने योग्य ती कार्यवाही केली जाईल, असंही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रसिद्धीमाध्यमांनी वस्तुस्थिती तपासून बातम्या द्याव्यात व कुठलाही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे करण्यात आले आहे.

#Diwali | दिवाली की सुरक्षा को लेकर नागपुर शहर पुलिस ने किया मार्केट इलाकों में ‘रूट मार्च’

Previous article#Diwali | दिवाली की सुरक्षा को लेकर नागपुर शहर पुलिस ने किया मार्केट इलाकों में ‘रूट मार्च’
Next article@COP26 | मोदी बोले- सोलर प्रोजेक्ट्स के लिए वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रिड दुनिया के लिए जरूरी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).