Home Bollywood #AryanKhanDrugCase | सह आरोपी मॉडेल मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चेंटची अखेर तुरुंगातून...

#AryanKhanDrugCase | सह आरोपी मॉडेल मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चेंटची अखेर तुरुंगातून सुटका

506
मुंबई ब्युरो : मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यासह मॉडेल असणारी मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चेंट यांना एनसीबी ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर अखेर शनिवार आर्यन खानला जामीन मिळाला होता. मात्र त्याच्या सोबत पार्टीत सहभागी असणारी मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चेंट यांनी जामीनीची प्रतिक्षा होती.

अखेर रविवारी मुनमुन आणि अरबाज यांना जामीन मिळाला असून, त्यांना तुरुंगातून बाहेर काढण्यात आले आहे. एनसीबीने त्यांनी 3 ऑक्टोंबर रोजी अटक केली होती. मुनमुन धमेचा ही भायखळा महिला जेलमध्ये होती. तर अरबाज हा ऑर्थर रोड जेलमध्ये तुरुंगात होता.

मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चेंट आणि मुनमुन धमेचा यांच्या जामीन अर्जावर शुक्रवार आदेश जारी केला. त्यानुसार आता या तिघांना प्रत्येक शुक्रवारी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत एनसीबी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.

एनसीबीने क्रूझवर छापा टाकत ड्रग्स पार्टीचा पर्दाफाश केला होता. त्यात दोन नायजेरियन नागरिकांसह 20 जणांना अटक करण्यात आली होती. त्यातील सुमारे 14 जणांना आतापर्यंत जामीन मंजुर करण्यात आला आहे.

#AryanKhanDrugCase | ऑर्थर रोड जेल से हुई आर्यन खान की रिहाई, मन्नत के बाहर झूमे फैंस

Previous article#gadchiroli । कार्यकर्ता मेळावा आणि पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने आज काँग्रेसचे शक्ती प्रदर्शन
Next article#Diwali । धनत्रयोदशीला का घेतात झाडू विकत ? जाणून घ्या याचे विशेष महत्व
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).