Home Election @Dev_Fadnavis | देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकर्त्यांशी घरी जाऊन भेटी सुरु, वारे मनपा निवडणुकीचे

@Dev_Fadnavis | देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकर्त्यांशी घरी जाऊन भेटी सुरु, वारे मनपा निवडणुकीचे

512

नागपूर ब्यूरो : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरमध्ये तळ ठोकून आहेत. देवेंद्र फडणवीस नागपूर महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आपला जनसंपर्क वाढवला असून त्यांचं कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेटी -गाठी घेणं सुरु आहे. फडणवीस यांनी आठवड्यातील दोन दिवस नागपूरमध्ये मुक्काम सुरु केला आहे. भाजपचं मिशन नागपूर मनपा निवडणूक सुरु असून त्यासाठी देवेंद्र फडणवीस अ‌ॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन घेत आहेत भेटी

नागपूर महानगरपालिका निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची झालेली आहे, त्यामुळेच भाजपच्या दिग्गज नेत्यांचा नागपुरात जनसंपर्क वाढवलाय. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील जनसंपर्क वाढवलाय. दर आठवड्याचे दोन दिवस फडणवीस नागपूरात मुक्कामी असतात आणि घरी जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. मुख्य म्हणजे यावेळी नागपुर जिल्ह्यात जिला परिषद् निवडणुकीचे निकाल भाजपच्या पक्षात फारसी चांगले आलेले नाहीत. यामुळे सुद्धा मनपा निवडणुकीला गांभीर्याने घेतले जाट आहे.

आज सकाळपासून नागपूर शहरात फडणवीस यांनी भेटीगाठी सुरु केल्या आहेत. आज सकाळी शहरातील सुभाषनगर भागातून फडणवीस यांचा दौरा सुरु झाला. दिवसभर ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत, अशी माहिती भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. महत्वाची बाब ही की नागपूर महानगरपालीकेत 15 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे.

भाजपसाठी प्रतिष्ठेची लढत

नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आणि गडकरी – फडणवीसांच्या होमपिचवरील महापालिका असल्यानं भाजपसाठी ही प्रतिष्ठेची लढत आहेत. त्यामुळेच केलेल्या विकास कामांवर भाजप आगामी निवडणूक लढणार आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीकडून निवडणुकीची तयारी

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणुकीची तयारी सुरु केलीय. गेल्या पंधरा वर्षांपासून नागपूर महापालिकेत विरोधी पक्षात असणाऱ्या काँग्रेसनं देखील निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांनी देखील नागपूर महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना तयारी लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.

@CredaiNagpur | क्रेडाई के प्रतिष्ठित प्रॉपर्टी एक्सपो का उद्घाटन, अंतिम 2 दिन शेष

Previous article@CredaiNagpur | क्रेडाई के प्रतिष्ठित प्रॉपर्टी एक्सपो का उद्घाटन, अंतिम 2 दिन शेष
Next article#Diwali । डीसीपी विनिता साहू यांनी घेतली बँक मॅनेजर्स, ज्वेलर्स, व्यापारी यांची संयुक्त बैठक
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).