Home Covid-19 #covid_19 | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण

#covid_19 | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण

396
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच, राज ठाकरेंच्या आई देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. राज ठाकरे यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. तर घरातील इतर सदस्य क्वारंटाईन झाले आहेत.

राज ठाकरे यांची मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. कोरोनासदृश लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत.

पदाधिकाऱ्यांचे मेळावे सह सर्व दौरे रद्द

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज भांडुप येथे तर उद्या पुण्यामध्ये पदाधिकाऱ्यांचे मेळावे होणार होते. हे मेळावे अचानक रद्द करण्यात आले आहेत. या मेळाव्याला खुद्द राज ठाकरे संबोधित करणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. मात्र राज यांची तब्येत यांची तब्येत ठिक नसल्याने हे मेळावे पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आता राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

@priyankagandhi | महिलाओं के बाद अब किसानों और युवाओं के बीच पैठ बना रही कांग्रेस, प्रियंका गांधी ने ली 7 प्रतिज्ञाएं

Previous article@priyankagandhi | महिलाओं के बाद अब किसानों और युवाओं के बीच पैठ बना रही कांग्रेस, प्रियंका गांधी ने ली 7 प्रतिज्ञाएं
Next article@nitin_gadkari । पेट्रोल पंप बंद व्हावेत हीच माझी इच्छा, 35 लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).