Home Education JEE Advanced Result 2021 । जेईई ॲडव्हान्सड परीक्षेत राजस्थानचा मृदूल अग्रवाल बनला...

JEE Advanced Result 2021 । जेईई ॲडव्हान्सड परीक्षेत राजस्थानचा मृदूल अग्रवाल बनला टॉपर

481

संयुक्त प्रवेश परीक्षा म्हणजेच जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (IITs) अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चर आणि नियोजन कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली गेली होती. जे विद्यार्थी परीक्षेला बसले होते ते अधिकृत वेबसाईट jeeadv.ac.in वर निकाल पाहू शकतात. राजस्थानमधील जयपूरचा मृदूल अग्रवाल या परीक्षेत टॉपर बनला आहे. अग्रवाल यानं 360 पैकी 348 गुण मिळविले आहेत.

निकाल कसा पाहायचा?
  • स्टेप 1: सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट jeeadv.ac.in वर भेट द्या.
  • स्टेप 2: वेबसाईटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • स्टेप 3: तिथे तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख भरा आणि सबमिट करा.
  • स्टेप 4: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • स्टेप 5: निकालाच्या प्रतीची प्रिंट आऊट घ्या.
उद्यापासून समुपदेशन कार्यक्रम

आता आर्किटेक्चर अॅप्टिट्यूड टेस्टसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. आयआयटी आणि एनआयटीमध्ये प्रवेशासाठी समुपदेशन 16 ऑक्टोबरपासून सुरू होईल. मागील वर्षाप्रमाणे समुपदेशन प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असेल.

परीक्षेचा तपशील

जेईई मेन 2021 परीक्षा उत्तीर्ण करणारे 2.5 लाख विद्यार्थी जेईई अ‌ॅडव्हान्सड 2021 परीक्षेसाठी पात्र असतात. देशातील आयआयटी संस्थातील प्रवेशासाठी ही परीक्षा आयोजित केली जाते. जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षा या वर्षी आयआयटी खरगपूरतर्फे 630 परीक्षा केंद्रावर घेतली गेली आहे.

जेईई ॲडव्हान्सड नेमकी काय?

जॉइंट एंट्रन्स एक्झाम मेन्स परीक्षा उत्तीर्ण झालेले अडीच लाख विद्यार्थी जॉइंट एंट्रन्स एक्झाम ॲडव्हान्स्ड परीक्षेसाठी अर्ज करतात. जेईई ॲडव्हान्स्ड 2 पेपर्स मध्ये घेतली जाते. पहिला पेपर सकाळी 9 ते 12 तर दुसरा पेपर 2.30 ते 5.30 या वेळेत घेतला गेला. जेईई ॲडव्हान्स्ड 2021 मध्ये पात्र होण्यासाठी उमेदवारांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या तीन विषयांमध्ये किमान 10% गुण मिळवणे आवश्यक आहे. यासह, तिन्हीमध्ये एकूण 35% गुण मिळवावे लागतील. जे उमेदवार या दोन्ही पद्धतींमध्ये पात्र आहेत त्यांनाच गुणवत्ता यादीत स्थान दिले जाईल.

जॉइंट एंट्रन्स एक्झाम ॲडव्हान्सड परीक्षेनंतर कुठे प्रवेश मिळतो?

जॉइंट एंट्रन्स एक्झाम ॲडव्हान्सड परीक्षे नंतर देशातील आयआयटी संस्थांमध्ये प्रवेश घेता येतो. यामध्ये बॅचलर्स, इंटिग्रेटेड, मास्टर्स डिग्री कोर्स अशा अभ्यासक्रमांना जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रवेश मिळतो. आयआयटी खरगपूर, आयआयटी कानपूर, आयआयटी दिल्ली, आयआयटी मद्रास, आयआयटी बॉम्बे, या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.

APJ Kalam Birth Anniversary | ‘मिसाइलमैन’ का टीचर, साइंटिस्ट और फिर राष्ट्रपति बनने तक का सफर

Previous articleAPJ Kalam Birth Anniversary | ‘मिसाइलमैन’ का टीचर, साइंटिस्ट और फिर राष्ट्रपति बनने तक का सफर
Next articleNagpur News । कामठीत लवकरच बुद्धिस्ट थीम पार्कचा प्रकल्प राबवू, देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).