Home Dhammachakra Pravartan Din धम्मचक्र प्रवर्तन दिन । यावर्षी देखील नागपूरच्या दीक्षाभूमीवर उसळणार नाही निळा जनसागर

धम्मचक्र प्रवर्तन दिन । यावर्षी देखील नागपूरच्या दीक्षाभूमीवर उसळणार नाही निळा जनसागर

424

नागपूर ब्युरो : राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे दरवर्षी दसर्‍याला नागपुरातील दीक्षाभूमीवर आयोजित होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याचे आयोजन या वर्षी तेवढ्या मोठ्या प्रमाणावर करता येणार नाही.


या संदर्भात जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. राज्य शासनाने 24 सप्टेंबर रोजी निर्गमित केलेल्या धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबतच्या आदेशामध्ये मुद्दा क्रमांक 4 (xv ) अनुसार मोठ्या प्रमाणात गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना प्रतिबंधीत केले आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने नागपूर दीक्षाभूमीवर आयोजन करणाऱ्या परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पल कामठी अध्यक्षांशी 30 सप्टेंबरला बैठक घेतली. राज्य शासनाच्या दिशा निर्देशानुसार मोठ्या प्रमाणात गर्दी टाळण्याबाबतची सूचना केली तसेच नागपूर महानगरपालिका, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग व अन्य प्रमुख विभागाशीही या संदर्भात चर्चा केली. यामुळे यंदा दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यात निळा जनसागर उमळतांना दिसणार नाही.

भाविक एकत्रित येण्याच्या कार्यक्रमांना प्रतिबंध

राज्य शासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी मोठ्या संख्येने भाविक एकत्रित येण्याच्या कार्यक्रमांना प्रतिबंधित केले आहे. दीक्षाभूमी येथे 15 ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये येणाऱ्या अनुयायांची संख्या लाखोमध्ये असून या ठिकाणी राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे कोवीड- 19 चा प्रोटोकॉल पाळणे, राज्य शासनाचे उपरोक्त निर्देश पाळणे शक्य नसल्याचे, सर्व संस्था व विभागाचे मत आहे. त्यामुळे दरवर्षी होणारा हा अभिवादन सोहळा, यावर्षी होऊ शकणार नाही असे प्रशासनाने कळविले आहे.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व

बौद्ध धर्मीयांसाठी 14 ऑक्टोबर हा दिवस खास आहे कारण हा दिवस अनेकांना बौद्ध धर्मांतरण सोहळाची आठवण करून देणारा आहे. अशोक विजयादशमीचं औचित्य साधत14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर येथील दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या काही सोबती, अनुयायींसोबत नवयान बौद्ध धर्म स्वीकारला होता. बौद्ध धर्मियांच्या मान्यतांनुसार, भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचं चक्र बाबासाहेबांनी गतिमान करत ‘धम्मचक्र प्रवर्तन’ केले म्हणून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखला जातो.
सम्राट अशोका यांनी इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकामध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून ओळखला जातो. याच दिवसाचं औचित्य साधत 1956 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर 14 ऑक्टोबर तारखेला नागपूर मध्ये दीक्षाभूमीवर सुमारे 5 लाख अनुयायींसोबत डॉ. आंबेडकरांनी देखील बौद्ध धर्म स्वीकारला आणि पुढे नागपूरची धम्मभूमी दीक्षाभूमी म्हणून ओळखली जाऊ लागली.
का घेण्यात आला असा निर्णय ?

राज्य शासनाने धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी मोठ्या संख्येने भाविक एकत्रित येण्याच्या कार्यक्रमांना प्रतिबंधित केले आहे. नागपूर दीक्षाभूमी येथे 15 ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये येणाऱ्या अनुयायांची संख्या लाखोमध्ये राहणार असून या ठिकाणी राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे कोविड- 19 चा प्रोटोकॉल पाळणे शक्य नसल्याचे सर्व संस्था व विभागाचे मत आहे. त्यामुळे यावर्षी अभिवादन सोहळा होऊ शकणार नाही, असं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

समिती पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन घेतला निर्णय

जिल्हा प्रशासनाने नागपूर दीक्षाभूमीवर आयोजन करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पल कामठी अध्यक्षांशी 30 सप्टेंबरला बैठक घेतली. राज्य शासनाच्या दिशानिर्देशानुसार मोठ्या प्रमाणात गर्दी टाळण्याबाबतची सूचना केली. तसेच नागपूर महानगरपालिका, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग व अन्य प्रमुख विभागाशीही या संदर्भात चर्चा केली होती. सर्वांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्रेक द चैन अंतर्गत निर्णय

नागपूर येथे दीक्षाभूमीवर यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याचे आयोजन होणार नाही. शासनाच्या ब्रेक द चेन 4 (XV ) निर्देशातंर्गत नागपूर जिल्हा प्रशासनानं हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळं दरवर्षी दसर्‍याला दीक्षाभूमीवर आयोजित होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याचे आयोजन या वर्षी करता येणार नाही.

आता पुन्हा पुढील वर्षाची वाट पाहावी लागणार

कोरोना विषाणू संसर्गामुळं सलग दुसऱ्या वर्षी दीक्षाभूमीवर होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा रद्द करण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. दसऱ्याच्या दिवशी होणारा धम्मचक्र प्रवर्तन सोहळा होणार नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याला राज्यभरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लाखो अनुयायी नागपूरच्या दीक्षाभूमीवर हजेरी लावतात. धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यासाठी पुढील वर्षाची वाट पाहावी लागणार आहे.

ड्रॅगन पॅलेस मध्ये होणार धम्म चक्र प्रवर्तन महोत्सव

नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील ड्रॅगन पॅलेस मध्ये आज धम्म चक्र प्रवर्तन महोत्सव होणार आहे. विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्यायराज्य मंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित राहतील. दर वर्षी ड्रॅगन पॅलेस मध्ये धम्म चक्र महोत्सव साजरा केला जातो. कोरोना नियमांचं पालन करत महोत्सव होणार आहे.

धम्म चक्र प्रवर्तन दिवस | डॉ. भीमराव अंबेडकर ने अपने 3.65 लाख समर्थकों के साथ अपनाया बौद्ध धर्म

Previous articleMonsoon Returned | देश के करीबन सभी हिस्सों से वापस लौटा मानसून, इन राज्यों में अब भी बारिश की संभावना
Next articleNavy MR Notification। नौदलात मॅट्रिक रिक्रूट सेलरच्या 300 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).