Home Maharashtra MPSC | एमपीएससीकडून पीएसआय पदासाठी दोन वर्षानंतर शारीरिक चाचणीची तारीख जाहीर

MPSC | एमपीएससीकडून पीएसआय पदासाठी दोन वर्षानंतर शारीरिक चाचणीची तारीख जाहीर

431

मुंबई ब्युरो : तब्बल दोन वर्षानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (महाराष्ट्र दुय्यम सेवा) पीएसआय पदाच्या शारीरिक चाचणीच्या तारखा केल्या जाहीर केल्या आहेत. 2019 साली पीएसआय पदाची मुख्य परीक्षा झाली होती. 19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरदरम्यान पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी पीएसआय पदासाठी शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे.

496 पदांसाठी राबवली जाणार प्रक्रिया

तब्बल दोन वर्षानंतर एमपीएससीने ( महाराष्ट्र दुय्यम सेवा ) पीएसआय पदासाठी घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणीची तारीख जाहीर केली आहे. 2019 साली पीएसआय पदाची मुख्य परीक्षा झाली होती. त्यानंतर आतापर्यंत म्हणजेच तब्बल दोन वर्षांपासून ही भरती प्रक्रिया रखडली होती. कोरोना, मराठा आरक्षणाचा मुद्दा तसेच एमपीएससीच्या दिरंगाईपणामुळे ही भरती प्रक्रिया लांबली होती. मात्र आता शेवटी आयोगाना पीएसआय पदासाठी घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान पुणे, नाशिक, आणि कोल्हापूर या शहरांत शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. 496 पदांसाठी ही शारीरिक चाचणीची प्रक्रिया राबवली जात आहे.

Previous articleSocial Media | एक हफ्ते में दूसरी बार डाउन हुए फेसबुक-इंस्टाग्राम, कंपनी ने मांगी माफी
Next articleकांग्रेस सीडब्ल्यूसी की बैठक | 16 अक्टूबर को चुनाव और पार्टी अध्यक्ष के नाम पर लग सकती है मुहर
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).