Home Covid-19 Work From Home । भारतातील ‘या मोठ्या कंपन्या’ लवकरच बंद करणार आहेत...

Work From Home । भारतातील ‘या मोठ्या कंपन्या’ लवकरच बंद करणार आहेत वर्क फ्रॉम होम

403

मुंबई ब्युरो : कोरोनामुळे दीड वर्षांपासून संपूर्ण जगात अनेक कंपन्यांचं वर्क फ्रॉम होम (Work from Home) सुरु आहे. कर्मचारी आपल्या कुटुंबासह वेळ घालवत ऑफिसचं काम करताहेत. या वर्क फ्रॉम होम चा अनेक कंपन्यांना आर्थिक फायदाही झाला आहे. मात्र आता कोरोना प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. कोरोना रुग्णांचे आकडेही मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत. त्यामुळे अनेक आयटी कंपन्यांनी आणि इतर कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम संपूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही कंपन्यांनी आपल्या काही कर्मचाऱ्यांसाठी मॉडेल्स आणेल आहेत.

टीसीएस कंपनीनं सर्वात आधी वर्क फ्रॉम होम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 5,00000 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या या कंपनीनं तब्बल 70-80 टक्के कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसला बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 2022 च्या सुरुवातीपर्यंत हे कर्मचारी परत ऑफिसला येण्याची शक्यता आहे. तसंच यानंतर टीसीएसनं 25-25 मॉडेलची अंमलबजावणी करण्याचं ठरवलं आहे. यानुसार 5% कर्मचारी घरून काम करतील आणि उर्वरित 2025 पासून पूर्णपणे घरून काम करतील.

विप्रो आणि इन्फोसिस सारख्या आयटी कंपन्यांनी ऑफिस प्लॅनबाबत आपला हेतू स्पष्ट केला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, विप्रोचे चेअरमन रिशाद प्रेमजी यांनी ट्वीट केलं आहे की फर्म आपल्या कार्यालयांमध्ये कोरोनाव्हायरस प्रोटोकॉल कसे लागू करत आहे. त्यामुळे या कंपन्याही वर्क फ्रॉम होम बंद करण्याच्या मार्गावर आहेत.

आयटी क्षेत्रातील दिग्गजांव्यतिरिक्त, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक आणि येस बँक या वित्तीय गटांनी त्याचं वर्क फ्रॉम होम संपूर्णपणे बंद करण्याचे संकेत दिले आहेत. तसंच एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक सारख्या बँकांना इन्फोसिस, विप्रो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयात परत येण्यास सांगण्याचा विचार करत आहेत. काही कंपन्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात परतण्याचा पर्याय त्यांच्यावरच सोडत आहेत.

आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 3 दिवस सुटी

काही कंपन्यांमध्ये आयटी कर्मचाऱ्यांना 4 दिवसच काम करावं लागणार आणि 3 दिवस सुटी मिळू शकणार अशी चर्चा सुरु झाली आहे. भविष्यात कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबासह घालवण्याची संधीही मिळावी आणि ऑफिसचं कामही करता यावं. तसंच कर्मचाऱ्यांचं जीवन अधिक सुखकर बनवावं यासाठी 4 दिवस काम आणि 3 दिवस सुटी असा निर्णय अनेक कंपन्या घेण्याची शक्यता आहे.

Previous articleMaharashtra School Reopen। दीड वर्षानं आज वाजणार राज्याच्या अनेक शाळेची पहिली घंटा, असे आहेत नियम
Next articleकांग्रेसियों का विरोध जारी | लखीमपुर खीरी के लिए निकलीं प्रियंका गांधी को पुलिस ने हिरासत में लिया
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).