Home Education Maharashtra School Reopen। दीड वर्षानं आज वाजणार राज्याच्या अनेक शाळेची पहिली घंटा,...

Maharashtra School Reopen। दीड वर्षानं आज वाजणार राज्याच्या अनेक शाळेची पहिली घंटा, असे आहेत नियम

491

मुंबई ब्युरो : महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांसाठी आज (सोमवार, ४ ऑक्टोबर) अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण, कोरोनामुळे राज्यातील बहुतेक शाळा मागील दीड वर्षांपासून बंद होत्या त्या आज अखेर सुरू होत आहेत. आजपासून ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. तर, शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. मात्र, शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला असला, तरीही मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती असणे महत्त्वाचे आहे.

वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत विद्यार्थांना शाळेतला पहिला दिवस कायम स्मरणात राहिल, असा घालवण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः दीर्घ कालावधीनंतर उगवलेला हा दिवस उत्साहात साजरा करा. पहिल्या दिवसाचे उत्तम अनुभव आमच्यासोबत शेअर करा. शाळेतील तुमचे फोटो,व्हिडिओ,गाणी,कविता @thxteacher या ट्विटर खात्याला टॅग करून पोस्ट करा, असं त्यांनी सांगितलं आहे.

सरकारचे नियम आणि पालक-शिक्षकांना सूचना –
  1. राज्यातील काही भागांत तब्बल दीड वर्षांनंतर शाळा सुरक्षितपणे पुन्हा सुरू होत आहेत. त्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षणाचा उत्सव होऊन विद्यार्थ्यांचे स्वागत व्हायला हवे, याबाबत आवश्यक त्या सूचना केल्या आहेत, असंही राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
  2. राज्य सरकारच्या सूचनांनुसार, मुलांना शाळेत पायी येण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहित करावं. ज्या शाळांमध्ये स्कूल बस किंवा खासगी वाहनाद्वारे विद्यार्थी येतात, अशा वाहनांमध्ये एका सीटवर केवळ एकच विद्यार्थी बसून प्रवास करेल, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.
  3. कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगला महत्त्व आहे त्यामुळे वर्गातही योग्य शारीरिक अंतर राखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी वर्गात एका बाकावर एकच विद्यार्थी बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शाळेत प्रार्थना, स्नेहसंमेलन किंवा तत्सम कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नाहीत.
  4. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रांमध्ये भरवण्यात येतील. यासोबतच प्रत्यक्ष वर्गांचा कालावधी 3 ते 4 तासांपेक्षा अधिक नसावा, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. प्रत्यक्ष वर्गांसाठी जेवणाची सुट्टी नसेल, अशी सूचना देण्यात आली आहे.
  5. पहिल्या एक-दोन आठवड्यांमध्ये थेट शिक्षणावर भर न देता, विद्यार्थ्यांना शाळेची सवय होऊ द्यावी. कोव्हिड होऊन गेलेल्या विद्यार्थ्यांशी सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे वागावे, अशा सुचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत.
Previous articleGood News | महाराष्ट्र के किस चावल को मिला जीआई टैग?, आखिर कहां उत्पादित होता है ये चावल?
Next articleWork From Home । भारतातील ‘या मोठ्या कंपन्या’ लवकरच बंद करणार आहेत वर्क फ्रॉम होम
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).