Home Maharashtra UPSC Results | सारथी तसेच बार्टीच्या विद्यार्थ्यांचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यश...

UPSC Results | सारथी तसेच बार्टीच्या विद्यार्थ्यांचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यश कौतुकास्पद

444

मुख्यमंत्र्यांनी केले राज्यातील गुणवत्ता यादीतील सर्व  विद्यार्थ्यांचे अभिनंदन

मुंबई ब्युरो :  सारथी व बार्टी या संस्थेच्या प्रत्येकी 21 व 9 विद्यार्थ्यांसह  राज्यातील 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेत यश मिळवले आहे ही  अतिशय अभिमानाची आणि गौरवाची  बाब  असून  या सर्व विद्यार्थ्यांनी  या महत्वाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन महाराष्ट्राचे नाव मोठे केले,  त्यांचे  खूप कौतूक वाटते अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सारथीचे प्रयत्न

सारथीने मराठा, कुणबी, कुणबी- मराठा, मराठा- कुणबी विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीकरिता विद्यावेतन देऊन दिल्ली व पुणे येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेत नि:शुल्क प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती.  युपीएससीच्या मुलाखतीच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने वैयक्तिक स्वरूपात  तज्ज्ञांचे मार्गदर्शन  देण्यात आले.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास अर्थात सारथी ही संस्था लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करणारी संस्था आहे.  त्यातील उमेदवांराचे स्पर्धात्मक परीक्षेत यश वाढवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सारथीकडून केले जातात

बार्टीचे प्रयत्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) व राज्य शासनाच्या मदतीने देण्यात आलेल्या प्रशिक्षणातून अनुसूचित जातीतील 9 विद्यार्थ्यांनी युपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.  बार्टीमार्फत दरवर्षी राज्यातील निवडक विद्यार्थ्यांना युपीएससी परीक्षेच्या पुर्वतयारीसाठी दिल्ली येथे प्रायोजकत्व देण्यात येते.  मागील काही कालावधीत कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व मुलाखतीसाठी ऑनलाईन प्रशिक्षण व इतर मदत करण्यात आली.

Previous articleAurangabad । उंदराने केबल कुरतडल्याने 1.80 कोटींचे सिटी स्कॅन मशीन सहा महिन्यांपासून बंद
Next articleNagpur | पिछड़ावर्गीय अधिकारी-कर्मचारियों की पदोन्नति को लेकर महाआघाड़ी सरकार की उदासीन भूमिका
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).