Home Health Nagpur News । हाय प्रोटीन रेसिपी स्पर्धेत अस्मिता हुमणे प्रथम, मोहसीन सिद्दिकी...

Nagpur News । हाय प्रोटीन रेसिपी स्पर्धेत अस्मिता हुमणे प्रथम, मोहसीन सिद्दिकी द्वितीय; नितीन नायगांवकर यांना इनोव्हेशन पुरस्कार

725

डॉ. दंदे हॉस्पिटल आणि डॉ. दंदे फाऊंडेशन यांचा संयुक्त उपक्रम

नागपूर ब्युरो : डॉ. दंदे हॉस्पिटल आणि डॉ. दंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णालयातील सहकाऱ्यांसाठी हाय प्रोटीन रेसिपी स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या स्पर्धेत वैविध्यपूर्ण पदार्थ स्पर्धकांनी सादर केले.


दंदे हॉस्पिटल्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पिनाक दंदे यांच्या मार्गदर्शनात रुग्णालयातील सहकाऱ्यांसाठी हाय प्रोटीन रेसिपी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ मेघना कुमरे आणि दंदे हॉस्पिटल्सच्या संचालक डॉ. सीमा दंदे हाय प्रोटीन रेसिपी स्पर्धेच्या परीक्षक तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.

आहारतज्ज्ञांसोबतच रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनाही आहाराचे व त्याच्याशी संबंधित घटकांची माहिती असावी, या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली. दंदे हॉस्पिटल्सच्या आहारतज्ज्ञ निकिता दवंडे यांनी या स्पर्धेसाठी पुढाकार घेतला. यावेळी हाय प्रोटीन रेसिपी स्पर्धेच्या विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 

यांना मिळाले पुरस्कार
  1. प्रथम क्रमांक – अस्मिता हुमणे
  2. द्वितीय क्रमांक – मोहसीन सिद्दिकी
  3. तृतीय क्रमांक – आशिष वाराणशीवार
  4. प्रोत्साहनपर पुरस्कार – गीता माने व टिकेश कुलदीप
  5. इनोव्हेशन पुरस्कार – नितीन नायगांवकर
Previous articleBollywood News | ‘तारे जमीन पर’ की टिस्का चोपड़ा का इंस्टाग्राम हुआ हैक, एक्ट्रेस ने अकाउंट प्राइवेट किया
Next articleNagpur News । अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था- एम्स नागपूर देशात उत्तम रुग्णसेवेसाठी अग्रस्थानी ओळखले जाणार
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).