Home Social Media Nagpur News | न्यूजपोर्टलधारकांना मिळाली ऑनलाईन कार्यशाळेतून ऊर्जा

Nagpur News | न्यूजपोर्टलधारकांना मिळाली ऑनलाईन कार्यशाळेतून ऊर्जा

कार्यशाळेत झाले न्यूजपोर्टलधारकांच्या शंकांचे समाधान

नागपूर ब्यूरो : केंद्र शासनाने लागू केलेल्या माहिती व तंत्रज्ञान अधिनियमातील डिजिटल मीडियाच्या नवीन धोरणांविषयी न्यूज पोर्टलधारकांमध्ये अनेक गैरसमज होते. मात्र, कार्यशाळेत सर्व शंकांचे समाधान करण्यात आले.

केंद्र शासनाच्या या नवीन कायद्यानुसार न्यूजपोर्टल आणि डिजिटल मीडियाची भविष्यातील दिशा यावर चर्चा करण्यासाठी रविवारी, 26 सप्टेंबर रोजी रात्री 8 ते 10 वाजता न्यूजपोर्टलधारकांचा ऑनलाईन महामेळावा आयोजित करण्यात आला होता. यात मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचे विधिज्ञ डॉ. कल्याणकुमार यांनी मार्गदर्शन केले.

भारत सरकारने विविध समाज माध्यम मंचाचा वापर करणाऱ्या सामान्य जनांच्या डिजिटल माध्यमांवर प्रकाशित साहित्यविषयक तक्रारींचे निवारण करणे तसेच त्यांच्या हक्कांचे उल्लंघन होत असेल तर त्याची जबाबदारी निश्चित करणे शक्य व्हावे, यासाठी 25 फेब्रुवारी 2021 पासून नवे माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि माध्यमांसाठी आचार संहिता) नियम 2021 अधिसूचित केले आहे.

यावर देवनाथ गंडाटे यांनी आपल्या प्रास्ताविकात भूमिका विषद केली. त्यानंतर प्रमुख वक्ते डॉ. कल्याण कुमार यांनी मार्गदर्शन केले. मुख्य वक्त्यांच्या मार्गदर्शनानंतर प्रश्नोत्तरावर चर्चा झाली. अनेकांनी आपल्या मनातील छोट्या-छोट्या शंका देखील विचारल्या. हा वेबिनार सर्व डिजिटल वृत्त माध्यमांसाठी व संबंधित व्यक्तींसाठी उपयुक्त ठरला. या कार्यशाळेत महाराष्ट्रभरातील न्यूज पोर्टल धारकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here