Home Education Varsha Gaikwad । ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी, शहरी भागात...

Varsha Gaikwad । ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी, शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होणार : वर्षा गायकवाड

495

मुंबई ब्युरो : जुलै महिन्यात शासन आदेश काढून ग्रामीण भागात 8 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर 5 वी ते 8 च्या शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. टास्क फोर्स, शिक्षणतज्ज्ञ यांच्या सूचनेनुसार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता. टास्क फोर्सनं शिक्षक आणि पालक यांच्या बैठकीत काय चर्चा करायची यासंदर्भात माहिती दिली आहे. पालकांची संमती असणं गरजेचं आहे. फिजिकल डिस्टन्सिगं याचं पालन करण्यासंदर्भात सूचना देण्यात येणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना आम्ही 4 ऑक्टोबरला शाळा सुरु करत आहोत, अशी माहिती देणार आहे.

टास्क फोर्सकडून नव्या सूचना मिळाल्या आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहण्यास सक्ती नसेल. ग्रामीण भागातील 5 ते 12 वी आणि शहरी भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार आहेत, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सनं दिलेल्या सूचना शाळांच्या मुख्याध्यापकांना कळवल्या जातील. टास्क फोर्सच्या सूचना आणि शालेय शिक्षण विभागानं तयार केलेल्या मार्गदर्शक सूचना लवकरचं विद्यार्थी पालक आणि शाळांना कळवली जाणार आहे.

कोरोना नियम पाळून शाळा सुरु होणार

राज्यात 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करुन शाळा सुरु ठेवण्यात येणार आहेत. शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सकडून सूचना मिळाल्या आहेत.

पालकांची समंती महत्त्वाची

4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु होत आहेत पण विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक असेल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे पालक मंजुरी देणार नाहीत त्यांना उपस्थित राहण्यासाठी सक्ती करु नये, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

महाविद्यालय कधी सुरु करणार?

महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील महाविद्यालयं कधी सुरु होणार यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. पुण्यातील कार्यक्रमानंतर बोलताना उदय सामंत यांनी महाविद्यालय सुरु करण्याची वेळ आली आहे. राज्यातील महाविद्यालय दिवाळीनंतर सुरु करण्याचा विचार असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार

राज्यातील महाविद्यालयं सुरु करण्यासंदर्भात सगळ्या विद्यापीठांच्या कुलगुरूंकडून अहवाल मागवला आहे. महाविद्यालय कधी सुरु कर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. महाविद्यालय सुरु करण्याची वेळ आलेली आहे. दिवाळीनंतर महाविद्यालय सुरू करण्याचा विचार असल्याचं उदय सामंत महणाले आहेत.

Previous articleViral Video । 90 वर्षांच्या या आजींनी बिनधास्त भूर्रर्रर्र…कार चालवून सिध्द केले- “हौसलों से उड़ान होती है”
Next articleMaharashtra | महिला पुलिस के लिए सरकार का गिफ्ट, अब 12 नहीं सिर्फ 8 घंटे करना होगा काम
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).