शिकण्याचं कुठलंही वय नसतं ‘ज्याने ही गोष्ट सांगितली आहे ती पूर्णपणे बरोबर आहे. याचं उत्तम उदाहरण सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. देवास जिल्ह्यातील 90 वर्षांच्या आजी रेशमबाई तंवर यांनी “मंजिल उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है” ही म्हण सत्य असल्याचे सिद्ध करुन दाखवलं आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसणारी आजी, जी नव्वदीत कार चालवायला शिकली आहे आणि इतकी ट्रेन ड्रायव्हर झाली आहे की, आता हायवेवरही गाडी चालवत आहे. नव्वदीत कार चालवणाऱ्या आजीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
हा व्हिडिओ संदीप सिंग नावाच्या व्यक्तीने ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता की, ही आजीबाई महामार्गावर कार चालवत आहे आणि तिच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास देखील स्पष्टपणे दिसत आहे. रेशम बाई तंवर यांचा कार चालवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दादी मां ने हम सभी को प्रेरणा दी है कि अपनी अभिरुचि पूरी करने में उम्र का कोई बंधन नहीं होता है।
उम्र चाहे कितनी भी हो, जीवन जीने का जज़्बा होना चाहिए! https://t.co/6mmKN2rAR2
— Shivraj Singh Chouhan (मोदी का परिवार ) (@ChouhanShivraj) September 23, 2021
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही आजीबाईंचा हा व्हिडीओ पाहून ट्विटर अकाउंटवरुन शे्अर करण्याचा मोह आवरता आला नाही. शिवराज सिंह चौहान यांनी यासाठी दादीचे खूप कौतुक केले आहे आणि आपल्या ट्विटद्वारे दादीचे वर्णन इतरांसाठी प्रेरणा म्हणून केले आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले, ‘आजीने आपल्या सर्वांना प्रेरणा दिली आहे की, कुठलंही काम करण्यासाठी वयाची अट नाही. वय कितीही असो, आयुष्य जगण्याची उत्कट इच्छा असली पाहिजे!
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यासोबतच लोक त्यांच्या प्रतिक्रियाही शेअर करत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करताना लिहिले, ‘दादीला सलाम’ दुसऱ्याने लिहिले, ‘ग्रेट मी माझ्या आईलाही कार शिकवण्याचा प्रयत्न करेन’ अजून एकाने लिहिले, ‘आजीकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का?’ या व्यतिरिक्त, एकाने दादी टॅलेंटेड असं लिहिलं.
ठाण्याची 89 वर्षांची आजी बिनधास्त चालवते कार
कधीही कार मध्ये न बसलेली आजी जी सवय 89 वर्ष पण ती आज बिनधास्तपणे कार चालवते ठाणे जिल्ह्यात कल्याण तालुक्यातील दहागाव येथील आजीबाईने हे करून दाखवून दिले आहे आजींना चार वर्षांपूर्वी तिच्या नातवाने कार चालवण्याचे धडे दिले होते यानंतर आजीबाई बिनधास्तपणे कार चालू लागली आहे.
या आहेत कल्याण येथील दहागावच्या गंगाबाई मिरकुटे आजी. वयाच्या 89 व्या वर्षातही कार शिकण्याचा त्यांचा उत्साह एखाद्या तरूणीला लाजवेल असा आहे. लहानपणी गंंगाबाई यांनी फक्त बैलगाड्याच पाहिल्या होत्या. मात्र आता मुलं-नातू गाडी चालवतात हे पाहून आपणही गाडी शिकावं असं त्यांना वाटायचं. नातू विकास भोईर यांनी त्यांच्या आजीला गाडी चालवायची का असं विचारलं? तेव्हा आजी म्हणाल्या मला येईल का? तिथूनच विकास यांनी आजीला गाडी शिकवण्याचा ध्यास घेतला. आजीचं एकत्र कुटुंब आहे. तेव्हा आपण गाडी चालवत कुटुंबियांना देवदर्शनाला जावंं असं त्यांना वाटतं. तर कार चालवता येणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे ते सर्वांनीच शिकावं असं गंगाबाई सांगतात. प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे या मराठीतील म्हणीचा अर्थ आजींकडे पाहिल्यावर लगेच कळतो.