मुंबई ब्युरो : सोयाबीनचे घसरते दर आणि याकडे सरकारचे होत असलेले दुर्लक्ष यामुळे आपल्या दराबाबत आणि सरकारच्या धोरणाबाबत व्यक्त होणारा अनोखी उपक्रम सोशल मिडीयावर पाहवयास मिळाला. #सोयाबीन (#Soyabean) हा ट्रेंड गुरुवारी रात्री चालविण्यात आला होता. यामध्ये हजारो शेतकरी पुत्रांनी सहभाग नोंदवून आपला आक्रोश व्यक्त केला आहे. ना कुण्या पक्षासाठी तर आपल्या बापाच्या हक्कासाठी ही टॅग लाईन घेऊन सुरु करण्यात आलेल्या ट्रेंडला अनेकांनी प्रतिसाद दिला होता. याबाबत ब्रम्हा चाटे यांनी सोशल मिडीयावर आवाहन केल्यानंतर गुरुवारी सायंकाळी 6 ते रात्री 9 पयर्यंतच्या या ट्रेंडमध्ये हजारो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. या दरम्यान हे ट्रेंड टॅापला होता.यामध्ये तरुण शेतकऱ्यांनी सरकारचे धोरण आणि शेतकऱ्यांचे मरण याबाबत व्यथा मांडल्या आहेत.
नविन सोयाबीन बाजारात दाखल होताच 11 हजार रुपये क्विंटलचा दर होता. मात्र, हा दर काही तासांपुरताच मर्यादीत राहिला होता. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सोयाबीनचे दर कोसळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सरकारने राजकीय हेतू ठेऊन खाद्य तेलावरील आयात शुल्क हे कमी केले आहे तर दुसरीकडे सोयापेंडच्या आयातीला परवानगी ही दिलेली आहे.
The market for farmers' hard work has been set up.The fall in prices is not a coincidence, for which the tyrannical government is responsible. @PMOIndia#सोयाबीन#soyabean#farmer pic.twitter.com/PDI0uSvt21
— Shravankumar Pawar (@mr_shravan_555) September 24, 2021
त्यामुळेच सोयाबीनची आवक वाढताच दर हे कमी झाले आहेत. सरकारच्या या निर्णयाचा रोष अनेक शेतकरी पुत्रांच्या मनात होता. तो सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त ही होत होता. पण ब्रम्हा चाटे यांनी #सोयाबीन या माध्यमातून व्यक्त होण्याचे आवाहन केले होते. याला शेतकरी पुत्रांनी चांगला प्रतिसाद दिला होता. गुरुवारी रात्री हा ट्रेंड टॅापवर होता.
11 हजारावरील दर थेट 6 हजारवर
सोयाबीनची आवक सुरु होताच प्रति क्विंटल 11 हजाराचा दर मिळालेला होता. त्या दराच्या पावत्याही सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या. मात्र, हा मुहुर्ताचा दर असल्याचे सांगितले जात होते. पण दुसऱ्याच दिवशी सोयाबीनचे दर हे 2700 रुपयांनी घसरले होते. त्यामुळे सरकारचे धोरण आणि शेतकऱ्यांचे मरण अशा भावना शेतकरी पुत्र, शेतकरी नेते सोशल मिडीयावर व्यक्त करीत होते. पण गुरुवारच्या सोयाबीन ट्रेंड मुळे शेतकरीही कीती जागृत आहेत याचे उदाहरण पाहवयास मिळाले.
सोशल मिडीयावर शेतकरीही अॅक्टीव्ह
सोयाबीनच्या दराबाबत सर्वात जास्त रोष व्यक्त झाला असेल तर सोशल मिडीयावर. सोयाबीनचे दर कमी झाले तर मग तेलांचे का नाहीत अशी विचारणा अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. तर शेतकरी कुटुंबालाच पुरेल एवढेच उत्पादन घेऊन शेतीमालाचे महत्व काय हे निदर्शनास आणून देण्याची वेळ आल्याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर जागतिक पातळीवर सोयाबीनचे दर ठरतात पण सरकारच्या धोरणामुळे या फटका शेतकऱ्यांना कसा बसतो हे देखील निदर्शास आणून दिले आहे.