नागपूर ब्युरो : नागपूर मेट्रो पुनः एकदा देशात सर्वाधिक लोकप्रिय असे शासकीय कार्यालय ठरले आहे नागपूर मेट्रोच्या फेसबुक फॉलोवर्सची संख्या शनिवारी 6.50 लाख झाली आहे. पुणे मेट्रो रेल प्रकल्पाच्या फेसबुक फॉलोवर्सची संख्या 21 सप्टेंबर रोजी 6.20 लाख असून महा मेट्रोची एकूण फॉलोवर्स 12.70 लाख एवढी नोंद झाली आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पाचे फेसबुक पेज संपूर्ण देशभरातील सर्व शासकीय विभागाच्या फेसबुक पेज’च्या तुलनेत सर्वात ज्यास्त फॉलोवर्स’ची संख्या असणारे पहिल्या क्रमांकावर असणारे पान ठरले आहे.
6 एप्रिल 2020 रोजी नागपूर मेट्रो रेल फेसबुक फॉलोवर्सची संख्या 5.50 लाख नोंदविल्या गेली असून सदर फेसबुक 2015 मध्ये सुरु करण्यात आले असून दर वर्षी 1 लाख फॉलोवर्सची यामध्ये वाढ होत आहे.
महा मेट्रोच्या फेसबुक पेजवर नागरिकांना सतत प्रकल्पाविषयी अपडेटेड ठेवले जाते. प्रकल्पाचे बांधकाम, स्थानकांच्या स्थापत्य कलेशी संबंधित माहिती, बाह्य-आंतरिक सज्जा, प्रकल्पाशी संबंधित तांत्रिक माहिती, वापरण्यात येणाऱ्या यंत्राविषयी माहिती, कार्यादरम्यानचे आकर्षक छायाचित्रे या पेजवर शेअर केली जातात. साधारणतः आठवड्याला 3 लाख नागरिक नागपूर मेट्रोच्या फेसबुक पेज वर भेट देत असून सुमारे 70,000 नागरिक फेसबुक पोस्टला लाईक आणि कमेंट करत असतात.
याशिवाय नागरिकांना जोडून ठेवण्यासाठी वेळोवेळी अनेक ऑनलाईन स्पर्धा, जमिनीस्त्रावरचे उपक्रम देखील आयोजित केल्या जातात. नागरिक मोठ्या उत्साहाने यात सहभागी होत असतात. येथे नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची यथोचित उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले जाते हि या पानांची वैशिष्ठ्ये आहेत. ‘लाईक, कमेंट्स व शेयर’च्या माध्यमाने सतत नागरिक या पानावर ऍक्टिव्ह राहतात.
पुणे आणि नागपूर शहरात मेट्रो प्रकल्पाचे कार्य वेगाने पूर्णत्वास येत आहे. नागपूर शहरात खापरी ते कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन व लोकमान्य नगर ते सीताबर्डी इंटरचेंज (एक्वा लाईन) दरम्यान मेट्रोची प्रवासी सेवा देखील सुरु झाली असून लवकरच कामठी आणि सीए रोड मार्गावर प्रवासी सेवा सुरु करण्याचा महा मेट्रोचा मानस आहे.