Home Maharashtra Maharashtra । राज्यात पुढचे पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra । राज्यात पुढचे पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

559

मुंबई ब्युरो : राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालंय. उद्यापासून म्हणजेच 20 सप्टेंबरपासून पुढचे तीन ते चार दिवस विविध भागांत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीय.

राज्यात पुढचे चार ते पाच दिवस पावसाची शक्यता IMD ने वर्तवली आहे. स्मॉल ऑरेंज डायमंड, उत्तर-पश्चिम मध्यप्रदेश, पुर्व राजस्थान स्थित कमी दाबाचे क्षेत्र येत्या 24 तासात क्षीण होतंय. स्मॉल ऑरेंज डायमंड बंगालच्या उपसागरावरची सिस्टिम पुढच्या 12 तासात ओरिसाकडे सरकेल व पुढच्या 2,3 दिवसात पश्चिम- उत्तर पश्मिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे, अशी माहिती के एस होसाळीकर यांनी दिलीय.

इथे पडणार पाऊस

कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

  1. 20 सप्टेंबर- पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, गोंदिया (यलो अलर्ट)
  2. 21 सप्टेंबर- पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड औ,रंगाबाद, जालना, बीड, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, , गोंदिया (यलो अलर्ट)
  3. 22 सप्टेंबर- पालघर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली (यलो अलर्ट)
Previous articleGanesh Visarjan 2021| राज्यभरातील गणपती बाप्पांना आज साश्रू नयनांनी निरोप
Next articleBollywood News | ‘तेजस’ के लिए पुलिस एकेडमी से जुड़े सीन शूट करेंगी कंगना रनोट
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).