Home Education Nagpur | नागपुर शहरात 24 तासांत 2 कोचिंग क्लासेसवर एनडीएस पथकाची धडक...

Nagpur | नागपुर शहरात 24 तासांत 2 कोचिंग क्लासेसवर एनडीएस पथकाची धडक कारवाई

469

नागपूर ब्युरो : नागपुरात विनापरवानी कोचिंग क्लासेस सुरु असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. नागपूर मनपाच्या उपद्रव शोध पथकाने (NDS) मोठी कारवाई करत गेल्या 24 तासांत दोन कोचिंग क्लासेसवर धडक कारवाई केली आहे. नागपुरातील गांधीबाग झोन अंतर्गत 2 कोचिंग क्लासेस वर कारवाई करण्यात आली आहे.

कोविड चे रुग्ण अजूनही शहरात मिळत असतांना नागपुरात विनापरवानी कोचिंग क्लासेस सुरु असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कोविड च्या नियंत्रणासाठी शासन आणि प्रशासनाने लागू केलेल्या दिशानिर्देशांचे पालन करून घेण्यासाठी मनपाच्या उपद्रव शोध पथकाने मोठी कारवाई करत गेल्या 24 तासांत दोन कोचिंग क्लासेसवर धडक कारवाई केली आहे.

नागपुरातील गांधीबाग झोन अंतर्गत 2 कोचिंग क्लासेस वर कारवाई करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या क्लासेसकडून 10,000 रुपयाचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे. उल्लेखनीय आहे की नागपूर मनपाने काल 42 प्रतिष्ठाने आणि मंगल कार्यालयांची तपासणी केली.

Previous articleBollywood News | अफगान रेस्क्यू मिशन पर बेस्ड फिल्म ‘गरुड़’ 15 अगस्त को होगी रिलीज
Next articleStock Market | रिकॉर्ड हाई पर सेंसेक्स, निफ्टी 17550 के पार, निवेशक हुए मालामाल
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).