Home Education Education | प्रशांत सावरकर पीएच.डी. पदवीने सन्मानित

Education | प्रशांत सावरकर पीएच.डी. पदवीने सन्मानित

564

यवतमाळ ब्यूरो: येथील प्रतिष्ठित नागरिक भाष्कर सावरकर यांचे चिरंजीव प्रशांत सावरकर यांना नुकतेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विद्यावाचस्तपती (पीएचडी) या उपाधीने सन्मानित केले आहे. “मिहान सेझ या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाची विदर्भाच्या औद्योगिक विकासामध्ये असलेली भूमिका” या त्यांच्या शोध प्रबंधास विद्यपीठाने पीएचडी प्रदान केली आहे. प्रामुख्याने विदर्भातील औद्योगिक विकासाचा सर्वसमावेशक अभ्यास या प्रबंधातून झाला आहे.

वाणिज्य शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा संशोधन ग्रंथ खूप मौलिक व अभ्यासपूर्ण असल्याची प्रतिक्रिया या संशोधन प्रकल्पाचे मार्गदर्शक , प्रसिद्ध विचारवंत डॉ. वामन गवई यांनी व्यक्त केली आहे. ही बहुमानाची पदवी संपादन झाल्यावर डॉ. प्रशांत सावरकर यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक डॉ. अरुण हरणे डॉ. वामन गवई, एस. व्ही. चहांदे यांचेसह परिवार व शुभचिंतकांना दिले आहे.

डॉ. प्रशांत सावरकर यांच्या यशाबद्दल प्रा. विठ्ठल आडे, शिक्षक भारतीचे अध्यक्ष साहेबराव पवार भानुदास केळझरकर, विलास काळे, डॉ. प्रेम हनवते, हेमंतकुमार कांबळे यांनी कौतुक केले आहे.