Home Social Nagpur | डाॅ. आंबेडकर भवनासाठी आंबेडकरी जनतेचा एल्गार

Nagpur | डाॅ. आंबेडकर भवनासाठी आंबेडकरी जनतेचा एल्गार

540
  • संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सर्व रिपब्लिकन पक्षातर्फे संयुक्त मोर्चा
  • आंबाझरी तलावा लगत जो पर्यंत डाॅ. आंबेडकर भवनाची निर्मिती होत नाही त्या जागेवर विकास कामे होवु देणार नाही: पक्ष, संघठनेची घोषणा
  • अविरत आंदोलन सुरुच राहणार. म.न.पा, शासनाचा निषेध करण्यात आला 
  • लोकशाही मार्गाने रस्ता रोको, जेल भरो आंदोलन चालु राहणार
  • SIT मार्फत चॊकशी करुन भवन उध्वस्त करणा-यांवर कठोर कार्यवाही करावी
  • पुर्वच्याच जागेवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची निर्मिती करण्यात यावी

नागपूर ब्यूरो: आंबेडकरी पक्ष, संघठनेच्या वतिने सोमवारी आयोजित मोर्च्याला संविधान चॊकातुन सुरवात झाली. डाॅ. आंबेडकर पुतळ्याला माल्यार्पण करुन, प्रचंड घोषणा देत हातात निळे झेंडे, मागणी फलक घेवुन जिल्हाधिकारी कार्यालया कडे मोर्चा निघाला.
वाहतुक विभाग कार्यालया जवळ मोर्च्याला अडवण्यात आले. जनतेचा रोष वाढला. आम्हाला पुढे जावु द्या. पुढा-यांच्या हस्तक्षेप होवुन त्याच ठिकाणि सभेला सुरवात झाली.
जोरदार पावसाने हजेरी लावुन सुध्दा जनता विचलित झाली नाही. आंबेडकरी जनतेचा रोष कमी झाला नाही. शिष्टमंडळाने, जिल्हाधिकारी यांच्या अनुपस्थितित निवासी उप-जिल्हाधिकारी जगदीश कातकर यांना निवेदन दिले. रिपाई, पिरिपा,रिपाई (आठवले), रिपाई (खोरिपा), समता सैनिक दल, भिम पँथर, भिमराज की बेटी, पश्र्चिम नागपुर भोजनदान समिती. रिपब्लिकन विद्यार्थी संघटना, साहित्यिक, वकील मंडळी, महीला, कार्यकर्ते, विध्दार्थी, भा. बॊध्द महासभा पदाधिकारी प्रमुख्याने सहभागी होते.

या मोर्च्यात मोठ्या संख्येने आंबेडकरी जनतेचा सहभाग होता. प्रा. जोगेन्द्र कवाडे, उपेंन्द्र शेंडे, भुपेश थुलकर, जयदिप कवाडे, बाळु घरडे, मनोज बन्सोड, अरुण गजभिये, सरदार कर्नलसींग, तारिक भाई, विस्वास पाटील, साहित्यिक धनराज प्रकाश कुंभे, इ.मो. नारनवरे, गोविन्द वाघमारे, अॅड. सोनिया गजभिये, बाळुमामा कोसमकर, कैलाश बॊंबले, राजा भाऊ नगराळे, प्रफुल बाराहाते, अनिल मेश्राम, अमूत गजभिये, दिनेश गोडघाटे, प्रेम गजभिये, यशत तेलंग, राजनीति वाघमारे, संजय जिवने, निरंजन वासनिक, रमेश घरडे, अजय चव्हाण, अॅड. स्मिता कांबळे, डाॅ. मनोज मेश्राम, अमन मेश्राम, धर्मपाल गजभिये, वर्षा मानवटकर, वनिता रामटेके, शोभा घरडे इ. प्रामुख्याने सहभागी होते. मोर्चा यशस्वी करण्यास बाळु घरडे, मनोज बन्सोड, अरुण गजभिये, विस्वास पाटील, बाळुमामा कोसमकर, कैलाश बॊंबले, ओमकार अंबादे, शुभम घरडे, अमन मेश्राम इ. अथक परिश्रम घेतले.

Previous articleJanmashtami 2021 | इस बार की जन्माष्टमी है कुछ ज़्यादा ही खास, बन रहा दुर्लभ संयोग
Next articleEducation | प्रशांत सावरकर पीएच.डी. पदवीने सन्मानित
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).