Home Maharashtra BJP On Election Mode । भाजपचे केंद्रीय मंत्री जनआशीर्वाद यात्रा काढणार, चंद्रशेखर...

BJP On Election Mode । भाजपचे केंद्रीय मंत्री जनआशीर्वाद यात्रा काढणार, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

724

नागपूर ब्युरो : भाजप निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनआशीर्वाद यात्रा काढणार आहे. 17 ते 22 ऑगस्ट दरम्यान नव्यानं निवड झालेले राज्यातील केंद्रीय मंत्री जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भाजपचे प्रमुख नेते चार दिवस दिल्लीत होतो. सरकारच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकासाठी करायची काम आणि दुसरीकडे पक्ष संघटन मजबूत कसं होईल, 50 टक्क्याची लढाई कशी होईल, भाजप मजबूत कशी राहिल यासंदर्भात हा दिल्ली दौरा होता, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

केंद्र सरकारच्या योजना समाजापर्यंत पोहोचवण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. नव्या मंत्र्यांना त्याच्या क्षेत्रात दौरे करण्यास सांगण्यात आलंय, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले . 17 ते 22 तारखे दरम्यान जनआशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजप तीन पक्षांविरोधात एकटा लढला तरी 51 टक्केची लढाई करुन आमचा पक्ष मजबूत राहिलं, असं चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले.

सध्या मनसेसोबतच्या युतीसंदर्भात चर्चा नाही

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीला जाण्यापूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. चंद्रकांत पाटील यांच्या भेटीमुळे मनसेसोबतच्या युतीसंदर्भात चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवी दिल्लीतील बैठकीत मनसे सोबतच्या युतीचा विषय अजेंड्यावर नव्हता, असं म्हटलं आहे. तर, हा विषय स्थानिक पातळीवरचा असल्याचं त्यांनी म्हटलंय.

भाजप चे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी सोमवारी भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
नव्या केंद्रीय मंत्र्यांची जनआशीर्वाद यात्रा

राज्यात भाजप ‘जनआशीर्वाद यात्रा’ काढणार आहे. महाराष्ट्रातील नव्याने झालेल्या चार केंद्रीय मंत्र्यांवर ‘जनआशीर्वाद यात्रे’ची जबाबदारी सोपवण्यात आलीय. नारायण राणे आणि कपिल पाटील कोकण, ठाणे मुंबईत यात्रा काढणार आहेत. तर, भागवत कराड मराठवाड्यात जनआशिर्वाद यात्रा’ काढणार आहेत.

भाजपकडून निवडणुकांची तयारी सुरु?

भाजप नेत्यांच्या चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. 17 ते 22 ॲागस्ट दरम्यान महाराष्ट्रात भाजपची ही जनआशीर्वाद यात्रा असणार आहे. शिवाय दिल्लीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व खासदारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्यात. भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ही बाब मान्य केलीय.

Previous articleNagpur | 2 साल बाद अपने माता – पिता से मिला दिव्यांग बच्चा, ‘आधार’ बना मिलन का आधार
Next articleBJP On Election Mode । जन आशीर्वाद यात्रा निकालेंगे भाजपा के केंद्रीय मंत्री, चंद्रशेखर बावनकुले ने दी जानकारी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).